मस्तीजादे : अजीर्ण
ऐंशीच्या दशकात हॉंगकॉंग सिनेमांनी कात टाकायला सुरुवात केली तेव्हा सॅमो हंग, जॅकी चॅन वगैरे प्रभूतींनी अॅक्शनला विनोदाची जोड देऊन अॅक्शन कॉमेडी या सिनेप्रकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर या सिनेमांची लाटच आली मराठीतल्या तमाशा व विनोदीपटांसारखी. जरी अॅक्शन कॉमेडी असली तरी त्यात विनोदाला ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं ते खचितच योग्य होतं असं म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ सॅमो हंग दिग्दर्शित घोस्ट पंटिंग, पेडीकॅब ड्रायव्हर किंवा विनर्स अँड सिनर्स मालिकेतले पहिले दोन सिनेमे हे यासाठी बघता येतील. यातील विनोद हा विनोदाच्या नावाखाली काय दाखवू नये याचे आदर्श उदाहरणे ठरावेत. बाळबोध, अश्लील व चावट विनोदांची पखरण यात करून त्याला सुरुवातीला व शेवटाकडे उत्तम अॅक्शन दृश्यांची जोड दिलेली. त्यामुळे सिनेमे निव्वळ कथानकावर धकवून नेलेत असा प्रकार क्वचितच दिसलेला. हिंदीत सेक्स व अॅडल्ट कॉमेडीच्या नावाखाली जे दाखवलं जात आहे ते बघून वरील सिनेमांची आठवण होते. सनी केले (तुषार कपूर) व आदित्य चोटीया (वीर दास) हे मित्र एका जाहिरात कंपनीत काम करत असतात. जाहिराती बनवणं झालं की ते त्यांच्या चीक्स रेच्या सह...