आजच्या श्रावणबाळांचं दुखणं -- भाग ३
गेली काही एक हजार वर्षांपासून आई-वडिलांची थोरवी इथे सांगितली जाते मग आज एकविसाव्या शतकात असा विरोधाभास का दिसून येतो? पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचे ढोल वाजवत असताना आपण आजूबाजूला दिसणारं वास्तव का विसरतो आहोत? त्याचं एक कारण आमच्या पिढीच्या आई-वडिलांना संवाद साधण्याची कलाच अवगत नाही. एक उदाहरण देतो. लातुरातील बऱ्याच समवयस्क मित्रांशी बोलताना असं लक्षात आलं की खूप जणांना त्यांच्या वडिलांना किती पगार होता हेच माहिती नव्हतं. वडिलांची निवृत्ती झाली तरी त्यांना ते माहिती नव्हतं. आता यामागे काय कारण असेल तर आपल्या मुलांना आपल्या पगाराविषयी सांगू नये ही भावना. पण ही भावना का निर्माण झालेली? आमच्या आई-वडिलांची पिढी ही पुरूषप्रधान व्यवस्था मानणारी व अवलंबवणारी. त्यामुळे घरात जेव्हा मुलांशी संवाद साधला जायचा तेव्हा मुलांनी वडीलांचा आदर ठेवूनच बोलायचं असा शिरस्ता असायचा. त्यामुळे वडील किती पगार घेतात हे कधीच विचारायचं नाही हा दंडक असायचा. मुलांशी पगाराबद्दल बोललं तर ते कमीपणाचं असतं त्यांना वाटत असावं. हा संस्कार त्यांच्यावर दोन कारणांचा आहे. पहिला त्यांची जडणघडण झालेला काळ. साधारण १९५० ते ७०...