Posts

Showing posts with the label 2019

शाश्वत सचदेवचं चिरकाळ स्मरणात राहणारं पार्श्वसंगीत – उरी

Image
सिनेमातील पार्श्वसंगीताबद्दल ए. आर. रेहमान म्हणतात, “काही सिनेमांमध्ये पार्श्वसंगीत हे वॉलपेपरसारखं असतं व इतरांमध्ये ते एक पात्र असतं.” २०१८ मध्ये श्रीदेवी अभिनीत ‘मॉम’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारात उत्कृष्ठ पार्श्वसंगीताचा पुरस्कार मिळाल्यावर ते बोलत होते. मॉम पार्श्वसंगीत ज्युकबॉक्स हिंदी सिनेमाचा विचार केला तर लक्षात येईल पार्श्वसंगीताला फारसं महत्त्व दिलं जायचं नाही किंवा दिलं गेलं तरी ते गाणी, गाण्यांचं संगीत व कथानकात त्याचं अस्तित्व जाणवायचं नाही. एकुणात ते नसल्यासारखच होतं. त्यामुळे जेव्हा रेहमान पार्श्वसंगीत हे पात्र असतं असं म्हणतात तेव्हा ते नक्कीच आर. डी. बर्मनबद्दल बोलत असावेत असं वाटतं. पार्श्वसंगीतातला बाप असं आरडींना म्हटलं तर वावगं ठरू नये. आर. डी. नी खऱ्या अर्थाने पार्श्वसंगीत हे सिनेमाला इतर गोष्टीं इतकच महत्वाचं असतं हे त्यांच्या कामातून दाखवून दिलं. ‘शोले’ हे मोठं उदाहरण. शोलेचा टायटल ट्रक किंवा बसंतीच्या मागे दरोडेखोर लागतात तो प्रसंग असू दे. आरडीचं संगीत प्रसंगाला साजेसं. सिनेमाला उठावदार करण्याचं काम किती महत्वाचं असतं हे शोले आणि दीवारमधील काम बघून लक्षात यावं...

चिंटू का बर्थडे आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स

Image
विसाव्या शतकाची असंख्य वैशिष्ट्ये आहेत. पैकी एक म्हणजे जगभरात स्थलांतरितांचा झालेला प्रवास. एका देशातून दुसऱ्या देशात जाणाऱ्यांची संख्या विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसून येते. खासकरून पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातून अमेरिकेत व त्यानंतर जगाच्या इतर भागातून युरोप अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसून येते. स्थलांतरित होण्याची कारणे बरीच आहेत. पैकी आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक ही मुख्य कारणे. आर्थिक कारण हे त्यातल्या त्यात ठळकपणे स्थलांतरित होण्यासाठी मजबूर करणारं. स्थलांतरित जरी वैध मार्गाने होणारं असलं तरी अवैध मार्गाने होणाऱ्यांची संख्या सुद्धा तितकीच आहे. किंवा असे म्हणता येईल वैध मार्गाने जाणाऱ्यांपेक्षा अवैध मार्गाने जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लालफितीच्या कारभारामुळे वैध ऐवजी अवैध मार्ग स्वीकारणारे बरेच दिसतात. त्यामुळे आजच्या काळात स्थलांतरितांचं जगणं ही एकाचवेळी त्या त्या भूभागासाठी पर्वणी आहे तर समस्या सुद्धा. पर्वणी या अर्थाने की शिकून नोकरी, व्यवसायासाठी जाणारा वर्ग हा तिथल्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी आयुष्य...

आजच्या श्रावणबाळांचं दुखणं -- भाग ३

गेली काही एक हजार वर्षांपासून आई-वडिलांची थोरवी इथे सांगितली जाते मग आज एकविसाव्या शतकात असा विरोधाभास का दिसून येतो? पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचे ढोल वाजवत असताना आपण आजूबाजूला दिसणारं वास्तव का विसरतो आहोत? त्याचं एक कारण आमच्या पिढीच्या आई-वडिलांना संवाद साधण्याची कलाच अवगत नाही. एक उदाहरण देतो. लातुरातील बऱ्याच समवयस्क मित्रांशी बोलताना असं लक्षात आलं की खूप जणांना त्यांच्या वडिलांना किती पगार होता हेच माहिती नव्हतं. वडिलांची निवृत्ती झाली तरी त्यांना ते माहिती नव्हतं. आता यामागे काय कारण असेल तर आपल्या मुलांना आपल्या पगाराविषयी सांगू नये ही भावना. पण ही भावना का निर्माण झालेली? आमच्या आई-वडिलांची पिढी ही पुरूषप्रधान व्यवस्था मानणारी व अवलंबवणारी. त्यामुळे घरात जेव्हा मुलांशी संवाद साधला जायचा तेव्हा मुलांनी वडीलांचा आदर ठेवूनच बोलायचं असा शिरस्ता असायचा. त्यामुळे वडील किती पगार घेतात हे कधीच विचारायचं नाही हा दंडक असायचा. मुलांशी पगाराबद्दल बोललं तर ते कमीपणाचं असतं त्यांना वाटत असावं. हा संस्कार त्यांच्यावर दोन कारणांचा आहे. पहिला त्यांची जडणघडण झालेला काळ. साधारण १९५० ते ७०...

आजच्या श्रावणबाळांचं दुखणं -- भाग २

तिच्या वावराने घरात बदल घडायला लागतात. ती नोकरी करणारी असेल तर अशा काही वस्तूंची घरात प्रवेश होतो ह्या कधी बघितलेल्या नसतात. तिला नवीन कपडे, फॅशन, कानातले घालण्याची सवय असते किंवा सासरी आल्यावर मनसोक्तपणे करावे असे वाटते. वावगं काहीच नसतं त्यात. नवऱ्याला आवडत असेल तर तिने ते करायला काहीच हरकत नाही. पण सासू-सासऱ्यांना ते आवडत नाही. कारण त्यांनी कधीच आपल्या मुलीला फॅशन करू दिलेले नसते. आपल्या मुलामुलींनी आपल्या धाकात, आज्ञेत राहायला पाहिजे असं वाटत असतं. त्यामुळे ते तिच्या कपड्यांवर शेरेबाजी करायला लागतात. मुलं सुरुवातीला दुर्लक्ष करायला लागतात. आई-वडील वागायला असेच आहेत म्हणून या बाबींकडे कानाडोळा करतो. पण घरात कुरबुरी वाढायला लागतात तेव्हा तो आई-वडिलांना बोलतो. त्यामुळे वाद व्हायला लागतात. सुनेमुळे वातावरण बिघडायला लागतं. याचं खापर तिच्यावरच ओढलं जातं. मुलगा-सून व आई-वडील यांच्यात दरी निर्माण होते. बोलणं जुजबी व्हायला लागतं. मुल वाढायला लागतं. तशी आई-वडिलांची लुडबुड वाढते. मुलांच्या संगोपनाचे निर्णय घेण्याचा हक्क त्याच्या/तिच्या आई-वडिलांना असतो पण त्यातही आमच्या पिढीचे आई-वडील लक...

आजच्या श्रावणबाळांचं दुखणं -- भाग १

आजच्या श्रावणबाळांचं दुखणं असं म्हणतो तेव्हा मला सध्याच्या काळात जगणाऱ्या माझ्या वयाच्या व जे पंचवीस ते पस्तीस या वयोगटात आहेत ते तरुण अपेक्षित आहेत. तसेच पंचविशीच्या खालचे सुद्धा यात येतात. आमच्या पिढीचं दुखणं मांडण्या आधी आम्ही कोणत्या पिढीत जन्मलो हे जाणून घेणं गरजेचं आहे. चर्चेपुरतं मी ज्या लातूर शहर व परिसरात वाढलो त्याचा हवाला देणार आहे. माझं असं मत आहे की आमचा मराठवाडा हा भारतीय समाजाची एक पेट्री डिश आहे जिच्यात आपण कसलंही कल्चर तयार करून त्याचा अभ्यास करू शकतो. प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीकरिता एक कल्चर तयार करून त्याचा अभ्यास करता येईल. कारण मराठवाड्याचा संपूर्ण भूभागच भारतीय समाजाचा एक अत्यंत ज्वलंत, जिवंत तुकडा म्हणून देखील बघता येईल. किंवा असे म्हणता येईल की भारतीय मानसिकतेचा उभा छेद घेतला तर मराठवाडा त्याचं उत्तम उदाहरण ठरेल ज्यात सर्व प्रकारचे नमुने, वृत्त्या-प्रवृत्त्या दिसून येतील. एका अर्थाने मराठवाडा हे भारतीय समाजाचं जीवशास्त्रीय कल्चर आहे असं म्हणायला हरकत नाही. पार्श्वभूमी आमच्या पिढीचा जन्म कधी झाला हे जाणून घेण्याआधी आमच्या आई-वडिलांची पिढी कधी जन्मल...

जोकर आणि ओसामा बिन लादेन

Image
“... Y'know they're schemers. Schemers trying to control their little worlds. I try to show the schemers how pathetic their attempts to control things really are. So when I say that you and your girlfriend was nothing personal, you know I'm telling the truth. It's the schemers that put you where you are. You were a schemer, you had plans, and, uh, look where that got you. I just did what I do best. I took your little plan, and I turned it on itself. Look what I did to this city with a few drums of gas and a couple of bullets, hmm? You know what I noticed? Nobody panics when things go according to plan. Even when the plan is horrifying. If tomorrow I told the press that, like, a gang-banger would get shot, or a truckload of soldiers will be blown up nobody panics. Because it's all part of the plan. But when I say that one little old mayor will die, well then everybody loses their minds! Introduce a little anarchy. Upset the established order and everything b...