Posts

Showing posts with the label Latur

अभिजात भाषा

Image
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आनंदाची गोष्टय. मला खूप आनंद झालाय अशातला भाग नाही. त्याचं कारण मला भाषेचं एक्पोजर जरी मराठीचं असलं तरी निव्वळ मराठीच माझी भाषा आहे असं मी म्हणू शकत नाहीत. किंवा माझ्यासारख्या बॉर्डर इलाख्याच्या जवळ जन्मणाऱ्या व पालनपोषण झालेल्याला भाषेबद्दल कट्टरता, अस्मिता किंवा वर्चस्व पण दाखवता येत नाही. खरं बोलायचं तर त्यासाठी माझ्या भूतकाळात व मी ज्या भौगोलिक वातावरणात वाढलो ते समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं १९७९ साली. वडिलांचं आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण लातूरच्या राजस्थान शाळेत झालेलं. नंतर इंजिनिअरींगचा डिप्लोमा त्यांनी गुलबर्ग्याच्या (आताचा कर्नाटकातली कलबुर्गी) कॉलेजातून केलं. पुढे काही दिवस हैदराबादेत जॉबसाठी ट्राय केल्यावर मराठवाड्यात एके ठिकाणी लेक्चरर म्हणून काम केलं. त्याचवेळी एमएसईबीत जागा निघाल्या. जॉब लागला सब-इंजिनिअर म्हणून. पहिली पोस्टिंग बहुतेक नांदेडला झाली कारण आईचे मामा (आत्याचे मिस्टर) आईचं स्थळ घेऊन त्यांना भेटायला आले होते ते तिथेच. तेव्हा वडील स्वतःच स्वैपाक करायचे. त्यांनी आईच्या मामांना व सोबत आलेल्यांना चहा ...

मेट्रिक्सची पंचवीशी

Image
  १९९८-९९ हे माझ्या बीकॉम फर्स्ट ईयरचं वर्ष. कॉलेज राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर. १२ सायन्समध्ये ५०% घेतल्यामुळे पुढे बीएस्सी करण्याची इच्छा नव्हती. मग घरचे म्हणाले बीकॉम करून सीए हो. (लो ऐम इज क्राईम) तर शाहू कॉलेजात अॅडमिशन घेतलं. सोबतच काहीतरी टेक्निकल शिकायला हवं म्हणून एनआयआयटीचा कोर्स करायला सांगितलं. तिथे घेतलं अॅडमिशन. तेव्हा लातुरात नुकताच एनआयआयटी चालू झालेलं. कम्प्युटरबद्दल आकर्षण केशवराज शाळेत असतानाच निर्माण झालेलं. शाळेत असणाऱ्या मोनोक्रोम मॉनिटरवर ‘प्रिन्स ऑफ पर्शिया’ बघितलेला. एनआयआयटीत एमएस डॉस व विंडोज शिकायला मिळाले. त्यामुळे कम्प्युटरचं जग काय भानगड असते ती कळायला लागली होती. त्याच्या पुढच्या अॅडव्हांस कोर्सला अॅडमिशन घेतलेली. एचटीएमएल, एसक्यूएल, सी, सी++, जावा व इतर गोष्टी शिकायला सुरूवात झालेली. पण ते इन्स्टीट्युट बंद पडलं त्यामुळे कोर्स तिथेच बंद पडला. (आणि जग एका मोठ्या व श्रेष्ठ दर्जाच्या प्रोग्रॅमरला मुकलं. नाही तर ‘९९ साला नंतरचे कम्प्युटर प्रोग्रामिंगशी निगडीत सगळे शोध मीच लावले असते.) हॉलीवूड सिनेमाचं दालन उघडलं गेलं ’९३ सालच्या ज्युरासिक पार्कमुळे. क...

सायोनारा

Image
  चित्रपट समीक्षक होणे माझा कधीच उद्देश नव्हता. पुण्यात शिकायला गेलो ते वेगळीच स्वप्ने डोक्यात घेऊन. जे ठरवलं होतं ते काही जमलं नाही. स्वप्ने काही पूर्ण करता आली नाहीत. नोकरीसारख्या नसत्या फंद्यात पडलो. तिथं पण फार चमक दाखवू शकलो नाही. लहानपणापासून सिनेमे बघणे कोणत्याही भाषेतले असो हिंदी, मराठी, कन्नड, इंग्लिश, किंवा हिंदी डब केलेले एवढाच उद्देश होता. वाचायला यायला लागल्यापासून पेपर वाचणे हा नित्यक्रम असायचा त्यातही चित्रपट समीक्षा वाचायला आवडायचं. चित्रपटावर घरात चर्चा ऐकायचो. त्या चर्चा कुठल्या तरी पेपरातील चित्रपट समीक्षेवर वा दिवाळी अंकातील लेखांवर आधारित असायची. त्यातनं किस्से वजा गॉसिपचं जास्त असायचं. मला आठवतंय माझा एक आतेभाऊ  रेंचा गणशत्रू की आगंतूक  बघून आला होता तेव्हा त्यावर बरंच बोलत होता. कोणत्या तरी फिल्म क्लब की सोसायटीत त्याने बघितला होता. रे हा मोठा दिग्दर्शक आहे एवढं त्याच्या बोलण्यावरून कळलं होतं. घरात चर्चा असायच्या त्या हिंदी, मराठी गाण्यांची व संगीताची कारण त्यावेळी आम्ही व आत्याचं कुटुंब एकत्र राहत असू. त्यामुळे सगळे मिळून टीव्हीवर सिरीअल्स, सिनेमे...

मंगेश रंजना रवींद्रनी दिलेला अभिप्राय

Image
आपल्या सर्वांमध्ये एक स्पार्क दडलेला असतो. गरज असते त्याला ओळखून ध्येयाच्या दिशाने सातत्याने वाटचाल करण्याची. त्या वाटचालीत तुम्हांला खूपदा मार्गदर्शक भेटत असतात. कारण सतत आपले मन आपल्याशी तळ्यात मळ्यात खेळत असते. अशावेळी गोंधळून गेलेल्या मनाला मार्ग गवसण्यासाठी मदत करतात ते मार्गदर्शक. अशाच एका गोंधळलेल्या तरुणाची कथा आहे ‘माधवराव एकंबीकर.’ वैभव नावाचा एकवीशीतला एक लातुरचा काॅलेज तरुण, इंजिनिअरिंगची दोन वर्षे फेल झालेला. त्याची ओळख एका साहित्य प्रेमी मित्राशी होते. त्यातुन त्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिक आजोबांबद्दल कादंबरी लिहण्याची कल्पना सुचते. त्याच्या लेखनकार्यासाठी त्याचा मित्र आणि इतिहासाचे प्राध्यापक त्याला पुस्तकरुपी मदत करु पाहतात. आपल्या अाजोबांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे म्हणूनच त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून प्रशस्तीपत्रक दिलेले होते असे त्याने बालपणापासून ऎकलेले असते. आपल्या आजोबांबद्दल माहिती जमा करत असता त्याच्या लक्षात येते घरातील कोणीही आजोबांबद्दल बोलायला तयार नाही. यामागे नक्की काय कारणे असू शकतात. ते खरंच स्वातंत्र्यसैनिक होते का? त्यांनी खरंच काही भव्...

पंचवीस वर्षे

Image
घर ८५ ला घराचं बांधकाम चालू झालं. तेव्हा औसा रोडच्या परिसरात मोजकीच घरे होती. जुना औसा रोड लहान असल्यामुळे नवीन औसा रोड तयार केला होता. त्याच्या लगतच प्लॉट असल्यामुळे तिथेच घर बांधायला घेतलं वडिलांनी. पहिल्यांदा बोर घेतला. ३५ फुटांवर पाणी लागलं. इतक्या वरच्या पातळीवर पाणी लागल्यामुळे अजून खूप खोल जायची गरज नाही म्हणून फक्त ११० फुटांपर्यंत बोर घेण्यात आला. घराचं बांधकाम झाल्यावर त्याच्यावर मोटर बसवण्यात आली. बांधकाम पूर्ण झालं. चार खोल्या, संडास-बाथरूम इतकंच बांधलं होतं. तेव्हा लोड बेअरिंगचे बांधकाम करणं सर्रास व स्वस्त असायचं. आमचं घर पण तशाच पद्धतीने बांधलेलं होतं. दोन खोल्यांची जागा सोडून उर्वरित जागेत बांधण्यात आलं. ८६ साली वास्तुशांती करून गृहप्रवेश केला. आजूबाजूला घरांची संख्या कमी असल्यामुळे बोरचे प्रमाण सुद्धा कमी होते. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी व उपलब्धता भरपूर होती. सबमर्सिबल पंपसेट बसवलेली बोर तेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडायचा. एल निनो व ला निनोचे परिणाम दिसायला अजून अवकाश होता. त्याचा फायदा उन्हाळ्यात बोरला पाणी राहण्यासाठी व्हायचा. आजूबाजूला घरांची संख्या हळ...

एक जुनी बातमी

1. ही एक जुनी बातमी . पाच वर्षांपूर्वीची. आज एका निमित्ताने याची आठवण झाली. लातूरच्या निखील गटागट नावाच्या मुलाने आपलं अपहरण झालंय व चोरट्यांनी जवळचे साठ हजार रूपये, मोबाईल, लॅपटॉप चोरून चोप देऊन वाशी पुलावरून पाण्यात टाकले असं पोलिसांना सांगितलं. तो पुण्यात सीओइपीला तिसऱ्या वर्षाला होता. पोलिसांनी पुण्यातली केस म्हणून पुणे पोलिसांकडे सुपूर्द केली. त्यांनी त्याला मार लागलंय म्हणून लातूरला पाठवलं. तोपर्यंत त्याचं अपहरण झालंय पण तो वाचलाय हे घरच्यांना कळलं. काही दिवसांनी पोलिसांनी परत एकदा चौकशीसाठी त्याला बोलावलं. त्यानं सांगितलेल्या घटनात संगती लागत नव्हती म्हणून त्यांनी त्याला विचारलं तो क्लासेस का अटेंड करत नाही व पाचव्या-सहाव्या सेमिस्टरचे रिझल्ट्स पण सांगितले.  तेव्हा त्याने आपण खोटच सांगितलंय असं कबूल केलं. तसेच हा सगळा बनाव त्यानेच रचलाय असंही कबूल केलं. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात तो नापास झाला होता व त्याला अभ्यासक्रम झेपत नव्हता. त्या दरम्यान इंग्रजी क्राईम थ्रिलर्स वाचायची सवय लागली होती. ते वाचून आपणही लेखक व्हावे असं त्याला वाटायला लागलं. पण घरच्यांच्या अपेक्षा पूर...

प्यादा आणि हिंदी पल्प फिक्शन

Image
लातुरातल्या मुख्य बस स्टँडमधल्या पेपर स्टॉलला भेट देणे हे लातुरात असतानाचे नित्यकर्मच असते. (आजही तो आहे.) शाळेत असताना त्या वेळी कार नसल्यामुळे म. रा. प. म. (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) च्या गाड्यातून दुसऱ्या गावी जाणे हाच पर्याय होता. उदगीर, गुलबर्गा, हुमनाबाद अशा गावांना जायला बस स्टँडलाच जायला लागायचं त्यामुळे तिथे गेलं की आधी त्या पेपर स्टॉलचं दर्शन घेणं ठरलेलं असायचं. त्याच्या समोरच्या एका बाजूला कॉमिक्स ठेवलेले असायचे. राज आणि डायमंड कॉमिक्सचे नायक नागराज, सुपर कमांडो ध्रुव, डोगा, भोकाल, बांकेलाल, चाचा चौधरी व इतरांचे कॉमिक्स ठेवलेले असायचे. त्यांना चाळून ते घेण्यासाठी वडिलांच्या मागे लागायचं. मला आठवतंय तेव्हा माझ्याकडे किमान शंभराच्यावर कॉमिक्स होते. ते नंतर कधीतरी आईनं मागे लागून रद्दीत घालायला लावले का तर त्यामुळे मी अभ्यास करायचो नाही. मग प्रवासात आणि ज्या ठिकाणी गेलं खासकरून उदगीरला गेल्यावर एका खोलीतल्या पलंगावर झोपून त्यात हरवून जायचं हे नेहमीचं. तिथेच त्या स्टॉलवाल्याच्या पाठीमागे तिन्ही बाजूनी असणाऱ्या शो-केसमध्ये जाडजूड पुस्तकं ठेवलेली असायची. ती...

कोर्ट : प्रेक्षकांसमोर प्रश्न उभे करणारे ‘कोर्ट’

Image
आपण जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा त्या कडून काय अपेक्षा करतो? त्याने मोजलेल्या पैश्याला शंभर टक्के मनोरंजन द्यायला हवं. वास्तव आयुष्यातल्या कटकटी परत पडद्यावर दाखवून मोजलेल्या पैश्यांची किंमत कमी करू नये. मनोरंजन करण्यासाठी गाणी, संगीत, दीर्घकाळ लक्षात राहतील असे संवाद, नायक-नायिकांचा चकचकीत आयुष्य आणि इतर बऱ्याच गोष्टी दाखवाव्यात. जेणेकरून चित्रपटगृहाबाहेर आल्यावर त्यातील अशक्य गोष्टी वास्तव वाटाव्यात आणि तेवढ्या क्षणापुरतं ते जगणं जगायला लावावं. पैसे फिटल्याचा पुरेपूर आनंद त्याने द्यावा. या पार्श्वभूमीवर नुकताच प्रदर्शित झालेला कोर्ट वरील अपेक्षांना उतरतो का ते बघणं संयुक्तिक ठरतं. महाराष्ट्र शासन विरुद्ध नारायण कांबळे (वीरा साथीदार) या केसमध्ये पासष्ट वर्षाचे लोकशाहीर असणारे हे गृहस्थ पोवाडे गाऊन दलित चळवळीला हातभार लावत असतात. अशाच एका कार्यक्रमात त्यांना अटक केली जाते. पोलीसांचं म्हणणं असतं त्यांच्या एका गाण्यामुळे पवार नावाच्या गटार साफ करणाऱ्या सफाई कामगाराने आत्महत्या केलेली असते. त्यांचं गाणं हे आत्महत्या करायला उद्युक्त करणारं असतं. या कामी वकील व्होरा (विव...