Posts

Showing posts from 2016

दंगल : गीताध्याय

Image
गेल्या काही महिन्यांमध्ये ट्रेलरवरून सिनेमा कसा असेल याचे अंदाज सोशल मेडियावर मांडले की घमासान चर्चा वाचण्यात येते. निव्वळ ट्रेलरवरनं सिनेमाची यथायोग्यता तपासण्यात येऊ नये असं विरोधकांचं म्हणणं. पण सिनेमा प्रदर्शित झाल्यावर ट्रेलरवरून सिनेमा समजतो असं म्हणणाऱ्यांना तो तोंडघशी पाडत नाही. ट्रेलर उत्सुकता वाढवणारा व आशयाला समोर आणणारा असेल तर प्रेक्षक नक्कीच थिएटरमध्ये येणार. दंगलचं ट्रेलर प्रदर्शित व्हायला लागल्यावर तो चांगलाच असणार असे सकृतदर्शनी तरी वाटत होते. सिनेमा निराश करत नाही तर एक प्रेरणादायी कथा मांडतो. हरियाणामधल्या बलाली इथल्या महावीर सिंग फोगाटला (आमीर खान) घरच्या अडचणींमुळे कुस्ती सोडून नोकरी करावी लागते पण त्याचं खेळाडू मन त्याला बसू देत नाही. आपल्याला मुलगा झाला तर तो देशाला सुवर्ण पदक मिळवून देईल या आशेवर तो असतो. त्याच्या दुर्दैवाने त्याला चारही मुलीच होतात. भारतीय रिवाजानुसार त्यांना रांधा, वाढा, उष्टी काढा यातच आयुष्य व्यथित करावं लागणार व आपलं स्वप्न भंगणार असं वाटत असतानाच समवयस्क मुलांनी दिलेल्या शिव्या न सहन होऊन गीता (झायरा वासिम, लहान व फातिमा सना शेख,...

घर

ऐंशीचं दशक संपण्याच्या दोन वर्षे आधी त्या गृहस्थांनी औरंगाबादसारख्या त्यावेळच्या शहरात सिडकोमध्ये प्लॉट विकत घेऊन घर बांधणं हे दिव्यच होतं. जुन्या औरंगाबादेत मुलांसहित काढल्यावर मध्यमवर्गीय मानसिकतेला अनुसरून त्यांनी सिडकोत घर बांधण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा घरात छोटासा भुकंपच झाला. कुठे तिकडे जाता, माणसं तोडायची आहेत का वगैरे बोलणं ऐकून ते घर बांधायच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यावेळी आजच्यासारखं बिल्डरला घर बांधायला देणं वगैरे नसल्यामुळे गवंड्याला हाताशी धरून घर बांधायला सुरुवात केली. त्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून घर बांधलं ज्याची शाश्वती तो सुद्धा देऊ शकला नसता. त्यामुळे घरात जी आय पाईप्सचे जाळे, त्यावेळच्या पद्धतीचा किचन ओटा-सिंक, स्पंज केलेल्या भिंती, त्यांना सिमेंट कलर्स मारलेले, भिंती पुढील काळात पावसात ओल धरणाऱ्या, भिंतीत फळ्या असणारी कपाटं, छताला गिलावा नसणे, काचा बसवलेल्या/न बसवलेल्या लोखंडी खिडक्या अशा अवतारात एक बेडरूम, हॉल, किचनचं ते घर सिडकोत इतर तुरळक घरांबरोबर दिमाखात उभं राहिलं. गृहस्थांना दोन मुले व दोन मुली. मुली नेहमीप्रमाणे दिल्या घरी सुखी राहिल्या...

प्रतिमा संवर्धनाचा सोस

Image
चरित्रपट किंवा कुठल्याही गंभीर विषयावर सिनेमा लिहिताना त्यातील वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवूनच लिहायला हवेत असा एक गैरसमज आपल्या इथे आहे. त्यामुळेच उडता पंजाबसारख्या सद्यस्थितीवर आधारित सिनेमाला विरोध करताना अनावश्यक मुद्द्यांची चर्चा केली जाते. प्रसंगी बंदी घालण्याची भाषा केली जाते. आक्षेपार्ह गोष्टी काढून टाकव्यात म्हणून बालिश सूचना केल्या जातात. राजकीय दबावतंत्राचा वापर केला जातो. खरंतर हे आपल्या समाजातूनच येतं जिथे प्रतिमा संवर्धन ही इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्वाची. लहानपणापासून याचे बाळकडू दिले जातात किंवा लहान मुले याच वातावरणात वाढत असल्यामुळे आजूबाजूला बघूनच शिकतात. हयातभर प्रतिमा संवर्धन करण्यातच या संस्कृतीतल्या लोकांची ऊर्जा खर्ची होते. त्यामुळे सिनेमासारख्या माध्यमातून जेव्हा चरित्रपट येतात तेव्हा किमानपक्षी त्रयस्थ भूमिकेतून मांडत असणारा विषय त्याच्या सर्व पदरानिशी येणं अपेक्षित आहे. एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा चरित्रपट त्याला अपवाद ठरत नाही. रांचीमध्ये जन्मलेला महिन्द्रसिंग धोनी (सुशांत सिंग राजपूत) हा पानसिंग धोनी (अनुपम खेर) यांचा मुलगा शाळ...

लई लवकर एक्झिट घेतलीत सर...

Image
शिरीष निर्मळे एका सामाईक मित्रामुळे आपली ओळख झाली. तेव्हा तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशन मासिकाचे काम करत होतात. आपला सामाईक मित्र संपादक होता. आपल्या अंका तर्फे आपण अन्वयार्थ दिवाळी अंक काढण्याच्या बेतात होतात. मी म्हटलं विशिष्ट विषयाला अंक वाहिल्यापेक्षा आपण दरवर्षी दिवाळी जसे वाचतो तसा एखादा अंक लातुरातनं काढावा अशी कल्पना मांडली. तुम्ही व मित्राने लगेच ती उचलून धरली. त्याला येणारा खर्च वगैरे बाबी ठरल्यावर कामही सुरु झालं. अंकासाठी जाहिराती तुम्हीच गोळा करणार होतात. तुमचं ते क्षेत्रच म्हणा. जाहिरात व्यवस्थापक म्हणून काम करत असल्यामुळे जाहिरातींबाबत आम्ही निश्चिंत होतो. फक्त अंकात काय, असावं काय असू नये याबद्दलच चर्चा व्हायच्या. तुम्ही आम्हाला पूर्ण स्वातंत्र दिलं होतं त्यामुळं आम्ही पण जोशाने कामाला लागलो. अंकाचं काम दररोज नाहीतर किमान एक दिवसा आड तरी कुठपर्यंत आलंय हे सांगण्याचं बंधन मात्र होतं. त्यामुळे बऱ्याचदा चहाच्या निमित्ताने किंवा तुमच्या दुकान कम ऑफिसात आपण बसत असू त्यावेळी अंका व्यतिरिक्त इतरही बाबींवर बोलणं व्हायचं. त्यात तुम्ही एक फ्लॅट बुक केलय व लवकरच तिथे राहा...

हॅप्पी भाग जायेगी: हॅप्पी सियाप्पा

Image
एसीपी उस्मान आफ्रिदीला हॅप्पीला शोधण्यासाठी सांगण्यात आलंय. तो हाताखालच्या लोकांना सांगतोय की लाहोर शहरात कसं कसं तिला शोधायचं. ते सांगता सांगता तो म्हणतो ज्यांना यात भाग घ्यायचा नाही त्यांनी एक पाऊल मागे जावं. एक पोलीस कॉन्स्टेबल पाठीमागे पाय टाकतो तर तो अधांतरी राहतो कारण ते पोलीस स्टेशनच्या गच्चीवर असतात. प्रसंग छोटासाच पण प्रचंड हसवणारा व लक्षात राहणारा. दुर्दैवाने मुदस्सर अझीझ लिखीत व दिग्दर्शित हॅप्पी भाग जायेगीमधला हा प्रसंग एकमेव असा राहतो. असे चांगले प्रसंग नंतर व त्या आधी बघायला मिळत नाहीत. हरप्रीत कौर उर्फ हॅप्पी (डायना पेंटी) तिच्याच लग्नामधून पळून जाते. ती ज्या ट्रकमध्ये आसरा घेते तो बिलाल अहमदचा (अभय देओल) असतो. तिला जाणीव होते तेव्हा ती लाहोरमध्ये त्याच्या घरी असते. इकडे भारतात अमृतसरमध्ये तिचा होणारा नवरा दमण सिंग बग्गा (जिमी शेरगील), प्रियकर गुरदीप उर्फ गुड्डू (अली फैझल) व वडील (कंवलजीत सिंग) तिला शोधण्यासाठी पंजाब पालथा घालत असतात. बिलालला जेव्हा कळतं की हॅप्पी चुकून त्याच्या ट्रकमध्ये आलीय तेव्हा तो तिला वापस भारतात पाठवण्याची तयारी करायला लागतो. यासाठी त्...

मदारी: चेहरा नसलेल्याची असहाय्यता

Image
हिंदुस्तानी सिनेमातला भ्रष्टाचाराला विटलेला म्हातारा नायक सेनापती हातात हत्यार घेतो तर नायक सिनेमातला न्यूज रिपोर्टर शिवाजी राव राजकारणांच्या कोडग्या वृत्ती विरुद्ध लढण्यासाठी एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याला तयार होतो जेणेकरून व्यवस्थेच्या आतून त्याची स्वच्छता करता येईल. दोन्हीकडे भारतातील सरकारी यंत्रणेतला सर्वच पातळीवर होणारा भ्रष्टाचार हा विषय केंद्रस्तानी होता. त्यातील नायकांना त्यांच्या कुवतीनुसार ते करायचं होतं. सिनेमाच्या काळाच्या चौकटीला झुकारून अशक्य वाटतील असे अवास्तववादी कृत्यही त्यांनी केलेले आहेत. दोन्ही सिनेमे किंवा या आधी या विषयांवर आलेले सिनेमे भ्रष्टाचारच्या मुळाशी न जाता वरवर त्यावर चित्र चौकटीला शोभतील असे उत्तर देऊन कथा मांडायचे. निशिकांत कामत दिग्दर्शित मदारीमध्ये हाच विषय थोड्या अधिक नीट पद्धतीने आलाय असं म्हणता येईल. देहरादूनमधून रोहन गोस्वामीचं (विशेष बन्सल) अपहरण होतं. रोहन केंद्रीय गृहमंत्री प्रशांत गोस्वामींचा (तुषार दळवी) मुलगा असतो. केंद्रीय मंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर संपूर्ण सरकारी यंत्रणा त्याला शोधण्यासाठी कार्यान्वित केली जाते. मंत्री सक्ष...

मला उद्धवस्त व्हायचंय् व इतर आत्मकथने

Image
आत्मकथन हा मराठीतला स्थिरावलेला साहित्यप्रकार. आयुष्य जगताना आलेले अनुभव, विशिष्ट विचारसरणी घेऊन केलेलं काम अशा असंख्य विषयांच्या अनुषंगाने लेखन झालं आहे. त्यातही दलित आत्मकथन जास्त प्रमाणात चर्चिले गेले. त्यावर अभ्यास केला जातोय. दलित साहित्य सर्वदूर पसरण्याचं व प्रभावित करण्याचं काम आत्मकथनांनी मोठ्या प्रमाणात केलं हे तर सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर इतरांनी सुद्धा आपल्या वाट्याला आलेले सुख-दु:ख कुठंतरी लिहून ठेवण्यासाठी आत्मकथन या साहित्यप्रकाराचा वापर केला. त्याला प्रतिसाद चांगला मिळालाय हे पण बघण्यात आलंय. आत्मकथानाला मर्यादा असते. ज्या व्यक्तीचे आत्मकथन आहे त्याने त्याच्या आकलनातून जगाकडे बघून ते लिहिलं असल्यामुळे त्याच्या नजरेला, दृष्टीकोनाला मर्यादा पडतात. सांगत असणाऱ्या वस्तुस्थितीचं सम्यक चिकित्सा होईलच याची शक्यता कमी असते. आत्मकथन म्हणजे अन्याय झालेला असणं (सर्वच अर्थाने) हा प्रमुख विषयवस्तू असणं हे सुद्धा दिसतं. काही काही आत्मकथन ही कंटाळवाणी तसेच आपल्याला व्यक्त व्हायचच आहे या अट्टाहासाने लिहिलीयत असं जाणवतं. त्यामुळे गेल्या काही वर्षात आत्मकथनांची पीछेहाट झालीय असं द...