Posts

Showing posts from February, 2016

तेरे बिन लादेन: डेड ऑर अलाइव्ह : फसलेला सीक्वेल

Image
सीक्वेल्स बनवताना त्यातील कथा पुढे जाणं अपेक्षित असतं. कथेचा धागा आधीच्या चित्रपटातील कथेशी मिळताजुळता असावा. तरीही ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाचा सीक्वेल करायचा ठरला तेव्हा राजकुमार हिरानीने त्यातील मुन्नाभाई व सर्किट ही दोनच पात्रे पुढील कथेसाठी निवडली. त्यांना वेगळ्याच घटना, प्रसंगात आणून एक वेगळ्या प्रकारचा सीक्वेल ‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये दिला. तोच प्रकार अभिषेक चौबेंनी ‘ईश्कीया’ सोबत केला. ‘डेढ ईश्कीया’ मध्ये खालूजान व बब्बन यांची कथा एका वेगळ्याच पार्श्वभूमीवर पेश केली. हा एक प्रकारचा ट्रेंडच ठरावा कारण अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘तेरे बिन लादेन: डेड ऑर अलाइव्ह’ वरील दिग्दर्शकांचा दृष्टीकोन वापरायचं ठरवतात. कथा सुरु होते जेव्हा शर्मा (मनीष पौल) या दिल्लीतल्या एका हलवायचा मुलगा मुंबईत ढेरेदाखल होतो तेव्हा. त्याला बॉलीवूडमध्ये मोठा दिग्दर्शक व्हायचं असतं जसे की गुरुदत्त, राजकुमार हिरानी, करण जोहर वगैरे. मुंबईत स्ट्रगल करत असताना त्याची पद्दी सिंगशी (प्रद्युम्न सिंग) ओळख होते. पद्दी सिंग हुबेहूब ओसामा बिन लादेनसारखा दिसत असतो. शर्माला त्याला घेऊन एक चित्रपट करायची आयडिय...

अलिगढ : हार्डीअन शोकांतिका

Image
प्राध्यापक श्रीनिवास सिरस “मी मज हरपून बसले गं...” हे गाणं समोर बसलेल्या श्रोत्यांसमोर सादर करत असतात तेव्हा त्यांच्या मनात असणाऱ्या भावना चेहऱ्यावर लख्खपणे दिसून येतात. अलिगढ चित्रपटातला हा प्रसंग काही क्षणांपुरताच येतो. त्यात प्राध्यापक सिरस त्यांच्या मिश्कील स्वभावचं दर्शन घडवतात पण त्याची पार्श्वभूमी मात्र प्रेक्षकांना हेलावून सोडते कारण ते मिश्कीलपणे गाणं म्हणत असले तरी ते ज्या दिव्यातून जात असतात त्याचा साक्षीदार प्रेक्षक असतो. त्याला ते सहन होत नसतं. हे असं एकाचवेळी गंभीर असणं व मिश्कील असणं चित्रपटात वेळोवेळी दिसून येतं. ८ फेब्रुवारी २०१० च्या रात्री अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक श्रीनिवास सिरस (मनोज वाजपई) नेहमीप्रमाणे त्यांच्या नेहमीच्या सायकलरिक्षावाल्यासोबत घरी यायला निघालेत. रात्र खूप झाली आहे. तो रिक्षावाला त्यांना सोडायला वरच्या मजल्यावर जातो. तो बराच वेळ बाहेर येत नाही. तेवढ्यात दोन इसम, पैकी एकाच्या हातात दंडुका असते व दुसऱ्याच्या हातात हँडीकॅम असतो, त्यांच्या घरात घुसतात. बराच वेळ आवाज ऐकू येतात. काही दिवसांनतर एक प्राध्यापक श्रीधरन त्यांच्याक...

लवशुदा : मळलेल्या वाटेमुळे निराशा

Image
रोमँटिक कॉमेडी किंवा रॉमकॉम या सिनेमा प्रकारची एका शब्दकोशातील व्याख्या अशी आहे, “एक असा विनोदी सिनेमा, नाटक किंवा टेलिव्हिजन प्रोग्राम की ज्या प्रेमकथेचा शेवट सुखांत असतो.” हा सिनेमाचा खूपच लोकप्रिय प्रकार. त्याचं मुख्य कारण म्हणजे हसू आणि आसू याचं एकत्रित चित्रीकरण जे प्रेक्षकांना भावतं, चटकन आपलंसं करतं. जीवन हे हसू आणि आसू याचं मिश्रण असतं अशा पद्धतीने सार्वत्रिक समजलं जातं त्याचं प्रतिबिंब म्हणजे रॉमकॉम सिनेमा. या निमित्ताने चटकन आठवावीत अशी नावे म्हणजे ‘चीनी कम’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘जब वी मेट’ किंवा हृषिदांचा क्लासिक ‘गोलमाल’. गिरीश कुमार-नवनीत कौर ढिल्लन अभिनीत लवशुदा असाच एक रॉमकॉम आहे. गौरव (गिरीश कुमार) त्याच्या खोलीत अस्ताव्यस्त झोपलाय. त्याच्या पलीकडून एक मुलगी, पूजा (नवनीत कौर ढिल्लन) उठते. गौरव हतबुद्ध होतो ही कुठनं आली कारण त्याच दिवशी त्याची एंगेजमेंट असते. तिचा रात्रीतून हरवलेला टॉप शोधत न बसता तिला त्याच्या होणाऱ्या सासूने खास बनवलेला शर्ट घालायला देऊन पळवून लावतो. पण नंतर लक्षात आल्यावर तिला शोधणं आलंच. त्याला तिचं नाव सुद्धा माहिती नसतं. आदल्या रात...

नीरजा : प्रेरणादायी

Image
धैर्यशील माणसे ही कोणत्याही प्रसंगात डगमगून जात नाहीत. त्यांच्यातील धाडसाला अशा प्रसंगांनी नवीन झळाळी मिळते. त्यांनी दाखवलेलं असामान्य कर्तृत्व इतरांसाठी प्रेरणादायी ठरतं. त्या धाडसाला किंवा समयसूचकतेला वयाची, जातीची, धर्माची बंधने नसतात. त्यांनी वेळ प्रसंगी प्राण गमावून इतरांचे प्राण वाचवणे हे इतर कुठल्याही कामापेक्षा काकणभर सरसच ठरतं. अशी जीवावर उदार होऊन इतरांसाठी आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्ती नेहमीच आदरास पात्र ठरतात. नीरजा भनोत ही तेवीस वर्षांची तरुणी ५ सप्टेंबर १९८६ मध्ये झालेल्या कराची विमान अपहरण प्रकरणात सहकारी व प्रवाश्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात मरण पावली. नीरजा तिच्या असामान्य कर्तृत्वाची कहाणी सांगतो. बॉम्बेत राहणारी नीरजा भनोत (सोनम कपूर) ही फ्लाईट पर्सर किंवा मुख्य अटेंडंट म्हणून अमेरिकन विमान कंपनी पॅन अॅमसाठी काम करते असते. तिची आई रमा भनोत (शबाना आझमी) - वडील हरीश भनोत (योगेंद्र टिकू) व भाऊ यांच्यासोबत तिचं आयुष्य सुखनैव चालू आहे. ५ सप्टेंबरच्या १९८६ च्या रात्री ती नेहमीप्रमाणे तिच्या कामावर रुजू होते. फ्लाईट ७३ ची ती मुख्य अटेंडंट आहे. सर्व सुरळीत पार प...

फितूर : ये दिल मांगे मोअर

Image
एखादी साहित्यकृती सिनेमासाठी रुपांतरीत करताना त्यातल्या कथानकाला धक्का न लावता तिचे काळानुरूप रुपांतर करण्यात यावे हे अपेक्षित असते. वर्तमान प्रेक्षकाला साहित्यकृतीच्या त्यावेळच्या काळाशी निगडीत कथानक दाखवण्यात आले तर कदाचित ते भावेल का नाही हे सांगणं मुश्कील आहे. त्या ऐवजी त्याला वर्तमानकाळाचा संदर्भ दिला तर तो तादात्म्य पावू शकतो. त्या बरोबरच साहित्यकृतीचं कालातीत असणं सुद्धा तपासता येतं. चार्ल्स डिकिन्सची ‘ग्रेट एक्स्पे क्टे शन्स’ अशीच एक गाजलेली साहित्यकृती. पटकथाकार-दिग्दर्शक अभिषेक कपूर याने काश्मीरच्या पार्श्वभूमीवर तिचं कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नूर (मोहम्मद अब्रार/आदित्य रॉय कपूर) काश्मीरमध्ये आपल्या मोठ्या बहिणीकडे राहत असतो. त्याला चित्रकलेची आवड असते. तसेच बहिणीच्या नवऱ्याला त्याच्या कामात मदत करत असतो. कामानिमित्त तो एकदा अंजुमन या हवेलीत जातो जिथे हजरत बेगम (आदिती राव हैदरी/तब्बू) तिची मुलगी फिरदौस (तुनिषा शर्मा/कतरिना कैफ) हिच्यासोबत राहत असते. नूरला बघून बेगम त्याला आपल्या तबेल्यातील घोड्यांना सांभाळायचं काम देते. नूर व फिरदौस यांच्यात मैत्री सोबत अ...

सनम तेरी कसम : आणखी एक स्टिरिओटाइप

Image
सुंदर दिसणे किंवा तत्सम गोष्टींचा अर्थ कसा लावायला हवा. एखादी व्यक्ती खासकरून तरुणी सुंदर आहे असं म्हटलं जातं तेव्हा ती नाकी-डोळी सुंदर दिसते की तिचा चेहरा सुंदर असतो. तिचा चेहरा देखणा आहे की तिच्या चेहऱ्याच्या ठेवणीला तिचा रंग जुळतोय की ती कशा पद्धतीचा पेहराव करते यावर तिचं सौंदर्य ठरवावं. निव्वळ बाहेरील सौंदर्याचाच मापदंड तिथे योग्य आहे की त्या व्यक्तीचे विचार, स्वभाव तिला इतरांपेक्षा वेगळं पाडून समोरील व्यक्तीच्या मनात तिच्याबद्दल एक प्रतिमा तयार करते जी त्याच्यापुरती सुंदर असते. ती आधुनिक अवतारात आहे की पारंपारिक यावर तिचं सौंदर्य जोखायला हवं. मग ही सुंदरता व्यक्तीसापेक्ष असते असं म्हणतात तेव्हा ते खरंच तसं असतं का! सरस्वती पार्थसारथी या सनम तेरी कसमच्या नायिकेबद्दल प्रेक्षकांना काही क्षणांकरीता निदान सिनेमातल्या वेळापुरतं तरी अशा पद्धतीने विचार करायला भाग पाडतं. सरस्वती/सरू पार्थसारथी (मावरा हुसैन) ही एका पारंपारिक तामिळ भाषिक वैदिक ब्राह्मण कुटुंबातील लग्नाच्या वयाची मुलगी मुंबईतल्या एका सुखवस्तू सोसायटीत राहत असते. वडील जयराम पार्थसारथी (मनीष चौधरी) नोकरदार माणूस. भा...

घायल वन्स अगेन : घायल वन्सच पुरे

Image
एखाद्या कथानकात शेवटी नायकाचा विजय झाल्यावर काही प्रश्नांची उत्तरे तशीच राहतात उदाहरणार्थ नायकाने खलनायकाला मारल्यावर जेलमधनं सुटून आल्यावर तो पुढे काय करतो. नोकरी करतो की धंद्याला लागतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या त्याच्यासाठी प्राथमिक निकड असते का. त्याने केलेलं कृत्य पुढे त्याचं नायकत्व अबाधित ठेवतं की त्याला सर्वसामान्य आयुष्य कंठायला लागतं. ही उत्तरं मिळत नाहीत कारण नंतरच्या अध्यायात काय झालं हे दिग्दर्शकाला सांगावं वाटत नाही किंवा कथेला परिपूर्णता आल्यामुळे तिला उगाच खेचण्यात अर्थ नाही असं कदाचित असू शकतं. १९९० साली आलेल्या ‘घायल’ सिनेमातला नायक अजय मेहरा जेव्हा खलनायक बलवंत रायला मारतो तेव्हा कथेची गरज त्याला पूर्णत्वाला नेते. त्याला जेल झाल्यावर त्याच्या कुटुंबाचं किंवा त्याचं पुढे काय झालं याला उत्तर राहत नाही. पण पटकथाकार-दिग्दर्शक सनी देओलला वाटतं अजय मेहराच्या आयुष्यात पुढे काय झालं ते सांगावं. आता अजय मेहरा (सनी देओल) सत्यकाम नावाच्या निर्भीड न्यूज चॅनलचा चालक-मालक आहे. तसेच तो पोलिसांना त्यांच्या अधिकाराच्या बाहेर असणाऱ्या केसेस मध्ये मदत करून रॉबिनहूड अशी प्रतिमा जप...