Posts

उडता पंजाब : बल्लीचं जग

Image
टॉमी सिंगला जेलमध्ये ठेवलंय. त्याच्यावर ड्रग्सचा पार्टीत वापर केल्याचा आरोप आहे. तो पाणी पिण्यासाठी हवालदाराला मागतो. पाणी दिलं जात नाही. तो नेहमीप्रमाणे शिव्या देतो. तिथं असणारा असिस्टंट इन्स्पेक्टर त्याला चार थोबाडीत मारून दुसऱ्या कोठडीत ठेवतो जिथे आधीच सर्व वयोगटातले कैदी असतात. त्यात दोन नुकतेच कॉलेजला जाणारे पोरं असतात जे त्याचे आठवीत असल्यापासून चाहते असतात. ते का कोठडीत बंद आहेत ते लगेच एका म्हाताऱ्याच्या तोंडून कळतं. त्यांनी ड्रग्ससाठी आईचा खून केलेला असतो. ते ऐकून टॉमी एकदम विस्मयचकित होतो. आपण ड्रग्स घेऊन जी गाणी बनवतो त्याचे काय परिणाम समाजावर झालेत याचा वास्तववादी आविष्कार त्याला सहन होत नाही. तो त्यांना तोंड द्यायचं टाळतो. उडता पंजाब सिनेमातला हा सर्वातसुंदर व संस्मरणीय प्रसंग आहे. कथानकात पुढे येणाऱ्या घटनांची चुणूक तो दाखवतो. दुर्दैवाने सिनेमात असे प्रसंग नाहीत पण एकूण परिणाम मात्र सुन्न करणारा. रात्रीच्या अंधारात पाकिस्तान-भारताच्या सीमारेषेजवळ तिघे जण येतात. त्यात शमशेर नावाचा एक जण जो थाळीफेकमधला खेळाडू असतो तो एक पाकीट थाळी फेकण्याच्या शैलीत भारताच्या दि...

ती३न : रहस्याच्या पलीकडे

Image
खलनायक कसा असावा याचे काही ठोकताळे ठरलेले आहेत. त्याने फक्त आणि फक्त खलनायकी कृत्ये करायची, नायकाला एकांगी त्रास द्यायचा, त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायचं हे पण ठरलेलं. त्यामुळे हिंदी व्यावसायिक सिनेमात खलनायक हे नेहमीच कृत्रिम, ठोकळेबाज राहिलेले आहेत. नायकांना बऱ्यापैकी वास्तववादी, जिवंत, त्रिमिती आकार देण्याचे प्रयत्न केले गेले आहेत पण खलनायक आजही त्याच त्याच पद्धतीने लिहिले जातात. ती३नमधील खलनायक हा रूढार्थाने खलनायक नाही तर त्याच्या कृत्याला एक ठोस कारणमीमांसा आहे. जी आजच्या सामाजिक परिस्थितीशी निगडीत आहे. पण दिग्दर्शकाने एकूण त्याचा वावर खलनायकासारखा ठेवल्यामुळे व शेवटाकडे त्याचं रहस्योद्घाटन केल्यामुळे तो सामान्य पातळीवर राहिला आहे. दाढीचे खुंट वाढलेले जॉन बिस्वास (अमिताभ बच्चन) हे कोलकात्याच्या पोलीस स्टेशनमध्ये दररोजच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांच्या अंजेला रॉय या नातीच्या आठ वर्षांपूर्वीच्या अपहरण व खूनाच्या केसचं काय झालं विचारण्यासाठी बसलेत. सरिता सरकार (विद्या बालन) ही पोलीस अधिकारी त्यांच्या दररोज येण्याला कंटाळली आहे. ती त्यांना आठ वर्षांपूर्वी झालेल्या घटने...

अझर : एक ना धड...

Image
एखादं कथानक हे वास्तव जीवनातल्या व्यक्तीवर आधारित असेल तर ते किमान वास्तविक वाटणे आवश्यक आहे. तसेच तो ज्या काळाचा विचार करून बनवण्यात आला तो काळ नुसतं यथातथ्य उभं करणं अपेक्षित नाही तर बघणाऱ्या प्रेक्षकाला त्यातील संदर्भ लागणे सुद्धा गरजेचं आहे. कथानक नजीकच्या भूतकाळातील असेल तर त्यात तपशीलासोबत सामाजिक संदर्भ येणं योग्य ठरतं. भूतपूर्व क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीन यांच्यावर सामना निश्चितीचे आरोप झाले. त्यासाठी त्यांच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली. तो काळ भारतीय क्रिकेटसाठी कसोटीचा काळ होता. ऐंशीच्या दशकापासून क्रिकेट विश्वावर स्वतःची मक्तेदारी स्थापन करणारा भारत देश एकदम सर्वांच्या चर्चेत आला. खेळात सुद्धा भ्रष्टाचार होऊ शकतो हे न पचणारं सत्य भारतीयांना पचवायला लागलं. अशा नजीकच्या भूतकाळावर आधारित सिनेमा बनवण्यात येतो तेव्हा तो वास्तविक घटनांना न्याय देतो का नाही हे बघावं लागतं. मात्र ‘अझर’ त्यांना न्याय देत नाही असं म्हणावं लागतं. एका खोलीमध्ये एक क्रिकेटर एका पत्रकाराला भारतीय क्रिकेटमध्ये काय चाललंय हे सांगायला त्याच्या कॅमेरासमोर बसतो. त्याच्या म्हणण्यानुसार अझरने (इमरान ...

बागी : मसालेदार कडबोळं

Image
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक गणेश मतकरी काही वर्षांपूर्वी एका साप्ताहिकात ‘हॉलीवूड-बॉलीवूड’ नावाचा सदर चालवायचे. ‘सिनेमा चोरांचा आत्मविश्वास’ या शीर्षकाने त्यांनी ‘चॉकलेट’ सिनेमाची समीक्षा केली होती. सिनेमा हॉलीवूडच्या कुठल्या कुठल्या सिनेमांवरून प्रेरित आहे किंवा थेट प्रभावित आहे याची त्यात उदाहरणं दिली होती. तरीही त्यांना निर्माता-दिग्दर्शकाच्या सिनेअभ्यासाचं कौतुक वाटत होतं. इंटरनेट, अवैध डीव्हीडींचा सुकाळ, इंग्लिश मुव्ही चॅनल्सची वाढती संख्या त्यामुळे जे हॉलीवूड व जागतिक सिनेमे इथे अधिकृतपणे प्रदर्शित होत नाहीत त्यांना बघण्याची, अभ्यासण्याची झालेली खूप मोठी उपलब्धी. पण त्याचा उलटा परिणाम झाला असं त्यांचं म्हणणं होतं.  हॉलीवूड किंवा कुठल्याही सिनेमाचा प्रभाव असला तरी त्यांची कथा सांगण्याची शैली, सर्व शक्यतांचा विचार करून लिहिलेली पटकथा, त्यानुसार चित्रीकरणात किंवा  तांत्रिक गोष्टीत चोखाळलेली वेगळी वाट वगैरे बाबींमुळे त्यांचे सिनेमे प्रभावी ठरतात. हे न उचलता आपल्याकडे चटकन व्यावसायिक यश मिळवण्यासाठी अनधिकृतरित्या त्यांच्या नकला केल्या जातात याचा त्यांना विरोध होता. हे सवि...

नील बटे सन्नाटा : स्वप्नाळू आईची भिडणारी गोष्ट

Image
ताजमहालच्या पार्श्वभूमीवर चंदा आणि अपु बोलत बसलेल्या. चंदा तिला स्वप्न का बघायची? ती साकार करण्यासाठी किती व कशा पद्धतीने मेहनत घ्यायची? कुणी आपल्या स्वप्नांच्या आड येत असेल तर त्यांच्याशी कसं वागायचं? वगैरे बाबींबद्दल बोलत असते. हे सांगणं सिनेमात ज्या टप्प्यावर येतं तो पर्यंत बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात. दहावीत असणारी अपु दहावी नंतर काय या प्रश्नावर एक सोपं उत्तर सांगून तिचे तोंड बंद करत असते. चंदासाठी हे आव्हान असतं तिला या उत्तरापासून परावृत्त करायचं. ते ती कसं करते याची कथा म्हणजे ‘नील बटे सन्नाटा’ हा सिनेमा. चंदा शिवलाल सहाय (स्वरा भास्कर) ही अपेक्षा सहायची (रिया शुक्ला) आई. आग्रा शहरातल्या एका गरीब वस्तीत दोघी राहत आहेत. चंदा कामवाली बाई म्हणून डॉक्टर दिवाणबाईंच्या (रत्ना पाठक शाह) घरी काम करत असते. तसेच उरलेल्या वेळात एका शूज बनवायच्या कंपनीत नोकरी करत असते.  अपेक्षा अभ्यासात लक्ष देत नसते त्यामुळे दरवर्षी काठावर पास होऊन वर्षागणिक जाडजूड होणारी पुस्तके वाचणेच आपल्या नशिबात आहे असं तिला वाटत असतं. चंदा तिला एकदा विचारते तुला दहावी नंतर काय करायचं आहे. डॉक्टर...

फॅन : शाहरूखीय जुगलबंदी

Image
‘होली स्मोक’ सिनेमातील एक तरुण स्त्री पात्र टॉम क्रुझची प्रचंड चाहती असते. नवऱ्याशी संग करत असताना सुद्धा तिला टॉम क्रुझच आपल्याशी संग करतोय असं वाटत असतं. सर्वसामान्य ऑस्ट्रेलिअन कुटुंबातील असून पण दूरदेशी असणाऱ्या एका स्टार अभिनेत्याप्रती असणारं प्रचंड आकर्षण तिच्यासाठी इतर गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचं असतं. स्टार अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्याबद्दल असणारं आकर्षण, त्यांच्या पडद्यावरील प्रतिमा ह्या खऱ्या मानण्याचा व तो/ती आपल्यातच वसलेली आहेत याची असणारी प्रचंड जाण ही त्यांना भेटण्याच्या, त्यांचे वाढदिवस साजरे करण्याच्या पलीकडे जाणारी असते. खरं आयुष्य व पडद्यावरील प्रतिमा यात महदंतर असते याची जाणीव सर्वांनाच असते असे नाही जसे की वरील उदाहरणात सांगितले तसेच ते गौरव चान्दनाच्या बाबतीत सुद्धा लागू होते. दिल्लीच्या इंदरविहारमध्ये राहणारा गौरव चान्दना (शाहरुख खान) हा एके सायबर कॅफे चालवणारा तरुण आर्यन खन्ना (शाहरुख खान) या बॉलीवूड सुपरस्टारचा प्रचंड चाहता असतो. अगदी लहानपणीपासून त्याने त्याचे सर्व सिनेमे बघितलेले असतात. त्याचे फोटोज व इतर गोष्टी गोळा केलेल्या असतात. जळी-स्थळ...