Posts

मदारी: चेहरा नसलेल्याची असहाय्यता

Image
हिंदुस्तानी सिनेमातला भ्रष्टाचाराला विटलेला म्हातारा नायक सेनापती हातात हत्यार घेतो तर नायक सिनेमातला न्यूज रिपोर्टर शिवाजी राव राजकारणांच्या कोडग्या वृत्ती विरुद्ध लढण्यासाठी एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याला तयार होतो जेणेकरून व्यवस्थेच्या आतून त्याची स्वच्छता करता येईल. दोन्हीकडे भारतातील सरकारी यंत्रणेतला सर्वच पातळीवर होणारा भ्रष्टाचार हा विषय केंद्रस्तानी होता. त्यातील नायकांना त्यांच्या कुवतीनुसार ते करायचं होतं. सिनेमाच्या काळाच्या चौकटीला झुकारून अशक्य वाटतील असे अवास्तववादी कृत्यही त्यांनी केलेले आहेत. दोन्ही सिनेमे किंवा या आधी या विषयांवर आलेले सिनेमे भ्रष्टाचारच्या मुळाशी न जाता वरवर त्यावर चित्र चौकटीला शोभतील असे उत्तर देऊन कथा मांडायचे. निशिकांत कामत दिग्दर्शित मदारीमध्ये हाच विषय थोड्या अधिक नीट पद्धतीने आलाय असं म्हणता येईल. देहरादूनमधून रोहन गोस्वामीचं (विशेष बन्सल) अपहरण होतं. रोहन केंद्रीय गृहमंत्री प्रशांत गोस्वामींचा (तुषार दळवी) मुलगा असतो. केंद्रीय मंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर संपूर्ण सरकारी यंत्रणा त्याला शोधण्यासाठी कार्यान्वित केली जाते. मंत्री सक्ष...

मला उद्धवस्त व्हायचंय् व इतर आत्मकथने

Image
आत्मकथन हा मराठीतला स्थिरावलेला साहित्यप्रकार. आयुष्य जगताना आलेले अनुभव, विशिष्ट विचारसरणी घेऊन केलेलं काम अशा असंख्य विषयांच्या अनुषंगाने लेखन झालं आहे. त्यातही दलित आत्मकथन जास्त प्रमाणात चर्चिले गेले. त्यावर अभ्यास केला जातोय. दलित साहित्य सर्वदूर पसरण्याचं व प्रभावित करण्याचं काम आत्मकथनांनी मोठ्या प्रमाणात केलं हे तर सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर इतरांनी सुद्धा आपल्या वाट्याला आलेले सुख-दु:ख कुठंतरी लिहून ठेवण्यासाठी आत्मकथन या साहित्यप्रकाराचा वापर केला. त्याला प्रतिसाद चांगला मिळालाय हे पण बघण्यात आलंय. आत्मकथानाला मर्यादा असते. ज्या व्यक्तीचे आत्मकथन आहे त्याने त्याच्या आकलनातून जगाकडे बघून ते लिहिलं असल्यामुळे त्याच्या नजरेला, दृष्टीकोनाला मर्यादा पडतात. सांगत असणाऱ्या वस्तुस्थितीचं सम्यक चिकित्सा होईलच याची शक्यता कमी असते. आत्मकथन म्हणजे अन्याय झालेला असणं (सर्वच अर्थाने) हा प्रमुख विषयवस्तू असणं हे सुद्धा दिसतं. काही काही आत्मकथन ही कंटाळवाणी तसेच आपल्याला व्यक्त व्हायचच आहे या अट्टाहासाने लिहिलीयत असं जाणवतं. त्यामुळे गेल्या काही वर्षात आत्मकथनांची पीछेहाट झालीय असं द...

उडता पंजाब : बल्लीचं जग

Image
टॉमी सिंगला जेलमध्ये ठेवलंय. त्याच्यावर ड्रग्सचा पार्टीत वापर केल्याचा आरोप आहे. तो पाणी पिण्यासाठी हवालदाराला मागतो. पाणी दिलं जात नाही. तो नेहमीप्रमाणे शिव्या देतो. तिथं असणारा असिस्टंट इन्स्पेक्टर त्याला चार थोबाडीत मारून दुसऱ्या कोठडीत ठेवतो जिथे आधीच सर्व वयोगटातले कैदी असतात. त्यात दोन नुकतेच कॉलेजला जाणारे पोरं असतात जे त्याचे आठवीत असल्यापासून चाहते असतात. ते का कोठडीत बंद आहेत ते लगेच एका म्हाताऱ्याच्या तोंडून कळतं. त्यांनी ड्रग्ससाठी आईचा खून केलेला असतो. ते ऐकून टॉमी एकदम विस्मयचकित होतो. आपण ड्रग्स घेऊन जी गाणी बनवतो त्याचे काय परिणाम समाजावर झालेत याचा वास्तववादी आविष्कार त्याला सहन होत नाही. तो त्यांना तोंड द्यायचं टाळतो. उडता पंजाब सिनेमातला हा सर्वातसुंदर व संस्मरणीय प्रसंग आहे. कथानकात पुढे येणाऱ्या घटनांची चुणूक तो दाखवतो. दुर्दैवाने सिनेमात असे प्रसंग नाहीत पण एकूण परिणाम मात्र सुन्न करणारा. रात्रीच्या अंधारात पाकिस्तान-भारताच्या सीमारेषेजवळ तिघे जण येतात. त्यात शमशेर नावाचा एक जण जो थाळीफेकमधला खेळाडू असतो तो एक पाकीट थाळी फेकण्याच्या शैलीत भारताच्या दि...

ती३न : रहस्याच्या पलीकडे

Image
खलनायक कसा असावा याचे काही ठोकताळे ठरलेले आहेत. त्याने फक्त आणि फक्त खलनायकी कृत्ये करायची, नायकाला एकांगी त्रास द्यायचा, त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायचं हे पण ठरलेलं. त्यामुळे हिंदी व्यावसायिक सिनेमात खलनायक हे नेहमीच कृत्रिम, ठोकळेबाज राहिलेले आहेत. नायकांना बऱ्यापैकी वास्तववादी, जिवंत, त्रिमिती आकार देण्याचे प्रयत्न केले गेले आहेत पण खलनायक आजही त्याच त्याच पद्धतीने लिहिले जातात. ती३नमधील खलनायक हा रूढार्थाने खलनायक नाही तर त्याच्या कृत्याला एक ठोस कारणमीमांसा आहे. जी आजच्या सामाजिक परिस्थितीशी निगडीत आहे. पण दिग्दर्शकाने एकूण त्याचा वावर खलनायकासारखा ठेवल्यामुळे व शेवटाकडे त्याचं रहस्योद्घाटन केल्यामुळे तो सामान्य पातळीवर राहिला आहे. दाढीचे खुंट वाढलेले जॉन बिस्वास (अमिताभ बच्चन) हे कोलकात्याच्या पोलीस स्टेशनमध्ये दररोजच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांच्या अंजेला रॉय या नातीच्या आठ वर्षांपूर्वीच्या अपहरण व खूनाच्या केसचं काय झालं विचारण्यासाठी बसलेत. सरिता सरकार (विद्या बालन) ही पोलीस अधिकारी त्यांच्या दररोज येण्याला कंटाळली आहे. ती त्यांना आठ वर्षांपूर्वी झालेल्या घटने...

अझर : एक ना धड...

Image
एखादं कथानक हे वास्तव जीवनातल्या व्यक्तीवर आधारित असेल तर ते किमान वास्तविक वाटणे आवश्यक आहे. तसेच तो ज्या काळाचा विचार करून बनवण्यात आला तो काळ नुसतं यथातथ्य उभं करणं अपेक्षित नाही तर बघणाऱ्या प्रेक्षकाला त्यातील संदर्भ लागणे सुद्धा गरजेचं आहे. कथानक नजीकच्या भूतकाळातील असेल तर त्यात तपशीलासोबत सामाजिक संदर्भ येणं योग्य ठरतं. भूतपूर्व क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीन यांच्यावर सामना निश्चितीचे आरोप झाले. त्यासाठी त्यांच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली. तो काळ भारतीय क्रिकेटसाठी कसोटीचा काळ होता. ऐंशीच्या दशकापासून क्रिकेट विश्वावर स्वतःची मक्तेदारी स्थापन करणारा भारत देश एकदम सर्वांच्या चर्चेत आला. खेळात सुद्धा भ्रष्टाचार होऊ शकतो हे न पचणारं सत्य भारतीयांना पचवायला लागलं. अशा नजीकच्या भूतकाळावर आधारित सिनेमा बनवण्यात येतो तेव्हा तो वास्तविक घटनांना न्याय देतो का नाही हे बघावं लागतं. मात्र ‘अझर’ त्यांना न्याय देत नाही असं म्हणावं लागतं. एका खोलीमध्ये एक क्रिकेटर एका पत्रकाराला भारतीय क्रिकेटमध्ये काय चाललंय हे सांगायला त्याच्या कॅमेरासमोर बसतो. त्याच्या म्हणण्यानुसार अझरने (इमरान ...

बागी : मसालेदार कडबोळं

Image
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक गणेश मतकरी काही वर्षांपूर्वी एका साप्ताहिकात ‘हॉलीवूड-बॉलीवूड’ नावाचा सदर चालवायचे. ‘सिनेमा चोरांचा आत्मविश्वास’ या शीर्षकाने त्यांनी ‘चॉकलेट’ सिनेमाची समीक्षा केली होती. सिनेमा हॉलीवूडच्या कुठल्या कुठल्या सिनेमांवरून प्रेरित आहे किंवा थेट प्रभावित आहे याची त्यात उदाहरणं दिली होती. तरीही त्यांना निर्माता-दिग्दर्शकाच्या सिनेअभ्यासाचं कौतुक वाटत होतं. इंटरनेट, अवैध डीव्हीडींचा सुकाळ, इंग्लिश मुव्ही चॅनल्सची वाढती संख्या त्यामुळे जे हॉलीवूड व जागतिक सिनेमे इथे अधिकृतपणे प्रदर्शित होत नाहीत त्यांना बघण्याची, अभ्यासण्याची झालेली खूप मोठी उपलब्धी. पण त्याचा उलटा परिणाम झाला असं त्यांचं म्हणणं होतं.  हॉलीवूड किंवा कुठल्याही सिनेमाचा प्रभाव असला तरी त्यांची कथा सांगण्याची शैली, सर्व शक्यतांचा विचार करून लिहिलेली पटकथा, त्यानुसार चित्रीकरणात किंवा  तांत्रिक गोष्टीत चोखाळलेली वेगळी वाट वगैरे बाबींमुळे त्यांचे सिनेमे प्रभावी ठरतात. हे न उचलता आपल्याकडे चटकन व्यावसायिक यश मिळवण्यासाठी अनधिकृतरित्या त्यांच्या नकला केल्या जातात याचा त्यांना विरोध होता. हे सवि...