Posts

मिशन इम्पॉसिबल रोग नेशन : वेलकम टू आयएमएफ

Image
वर्ष : १९९७/९८ स्थळ : लातूर थिएटर : यशोदा वेळ : १२ ते ३ सीट : बाल्कनीत उजव्या बाजूच्या एन्ट्रसच्या वरील बाजूस. मिशन इम्पॉसिबल नावाचा एक सिनेमा वरील थिएटरला आलाय. त्यात टॉम क्रूझ नावाचा चिकनाबांड नट आहे व तो अमेरिकेत धुमाकूळ घालतोय इतकी माहिती पेपरात वाचलेली. ज्युरासिक पार्कमुळे हॉलीवूडचे सिनेमे नाद खुळा असणारे आणि हिंदी सिनेमांपेक्षा वेगळे असतात हे तो पर्यंत पक्कं कळलेलं. हॉलीवूड सिनेमे लातुरात तेव्हा जवळ-जवळ दहा बारा महिन्यांनी यायचे. त्यामुळे हा सिनेमा इतका उशिरा येतोय म्हणजेच आपल्या छोटेखानी आयुष्यात वादळ आणणार. यथावकाश यशोदाच्या बाल्कनीत इथन हंटने त्याचे हावभाव आणि प्रभावी पुरुषी प्रतिमेने मेंदूचा भाग हळूहळू कुरतडायला सुरुवात केलेली. शेवटच्या लंडन-पॅरीस टीजीव्ही ट्रेनच्या मारामारीच्या सीनने आणि त्या इलेक्ट्रिफाईंग संगीताने तर इथन हंट जेम्स बॉंडसोबत आयुष्याच्या भाग होणार हे पक्कं झालं. आता पुढे हंटच्या कारनाम्यांचे साक्षीदार होणे हे घरचं कार्य झालं. २००० साली दुसरा भाग आला. तेव्हा लातुरात पायरेटेड सीडीज नाहीतर व्हीडीओ कॅसेट्स दुबईवरनं यायचे म्हणे.  स्...

शॉट : नितळ प्रेम की....

Image
शॉर्ट फिल्म ही त्याच्या चौकटीत परिपूर्ण असणे गरजेचे असते, ते का? एकतर त्याला वेळेची मर्यादा असते. अशी फिल्म फार तर चाळीस मिनिटांची असावी लागते त्यापेक्षा जास्त असेल तर ती फिचर फिल्म धरली जाते. याचा फायदा असा दिग्दर्शकाला थोड्या वेळात महत्वाचं आणि नेमकं दाखवून प्रेक्षकांना गुंतवून ठेवता येतं. हीच गोष्ट दिग्दर्शकासाठी उलटा परिणाम साधणारी असते. वेळेचं आणि आशयाचं भान सुटलं तर दिग्दर्शकाला आपण काय दाखवतोय हे लक्षात न येता परिणाम अप्रभावी ठरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या माध्यमाच्या मर्यादा आणि बलस्थानं लक्षात न घेता जर फिल्म बनवली तर आपसूकच ती दिग्दर्शकाच्या सृजनशीलतेवर मर्यादा आणू शकते. चांगल्या शॉर्ट फिल्म्स ह्या मर्यादित वेळेचा अनादर न करता उत्तम प्रकारे आशय मांडू शकतात. स्टीवन स्पीलबर्गची अॅम्ब्लीन आणि फिल व ओली या दिग्दर्शकद्वायींची द ब्लॅक होल या शॉर्ट फिल्म्स अशा प्रकारच्या फिल्म्स कशा असाव्यात याचा वस्तुपाठ ठराव्यात. दोन्हीत संवाद नाहीत पण ती मर्यादा प्रेक्षकांना विषय समजण्याच्या आड येत नाही. जर एखाद्या शॉर्ट फिल्ममध्ये संवाद असतील ते किती प्रभावी असू शकते हे शॉट ही ज्येष्...

आईस प्रिंसेस : चांगली सक्सेस स्टोरी

Image
आई-वडिलांना नेहमी वाटत असतं की आपल्या मुलाने/मुलीने आपण सेट केलेला गोल अचिव्ह करावं. भारतीय पालकांच्या बाबतीत तर त्यांच्या अपेक्षा ह्या तीव्र व अघोरी स्वरुपाच्या असतात. दरवर्षी दहावी-बारावीची निकाल लागला की आपल्या इथल्या मुलांनी अपेक्षित मार्क्स घेतले नाही तर किंवा पालकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत की आत्महत्या केली असं वाचतो. जर अशा मुलांना त्यांच्या पालकांनी वेळीच समजून घेतलं किंवा त्यांच्या शिक्षकांनी योग्य दिशा दाखवली तर ते वाट्टेल त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. हीच गोष्ट उत्तम कथे व भक्कम पटकथेद्वारे डिस्ने स्टुडिओनी दाखवली आहे. केसी कार्लाईल (मिशेल ट्रॅकटेनबर्ग) ही शाळेत शिकणारी मुलगी सायन्समध्ये चांगले मार्क्स घेते म्हणून तिचे शिक्षक तिला एक प्रोजेक्ट करायला सांगतात ज्याद्वारे तिला पुढील शिक्षणासाठी हार्वर्ड विद्यापीठाकडून स्कॉलरशिप मिळेल. तिच्या स्त्रीवादी आईला (जॉन क्युसॅक) आपण जे काही आपल्या मुलीला देऊ शकलो नाही ते या संधीद्वारे मिळेल म्हणून आनंद वाटतो. ती तिच्यासाठी वाट्टेल कष्ट उपसत असते. केसी प्रोजेक्टसाठी फिगर स्केटिंग निवडते कारण तिला त्यात फिजिक्स...

दहावी फ : वस्तुस्थितीपासून फारकत घेणारा सकारात्मक पलायनवादी

Image
२००२ साली जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा मी नापास होण्याच्या तिसऱ्या वर्षात होतो (एकूण पाच वर्ष नापास होतो.). सिनेमा बघितला असता तर कदाचित त्यातील कथानकाला भारावून जाऊन रडलो सुद्धा असतो. नंतर जेव्हा बीएस्सी सोडून बीए केलं तेव्हा आपण किती भयानक अनुभवातून गेलो आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली. तसेच आजूबाजूची परिस्थिती या चित्रपटात दाखवलेली आहे तशी खचितच नाही हे पण लक्षात आलं. एमए नंतर हे अनुभव लिहून नापास मुलांची सद्यस्थिती काय आहे हे मांडावं म्हणून लातूर पॅ टर्न नावाची कादंबरी लिहिली. काल रात्री जेव्हा मी हा सिनेमा बघितला तेव्हा मी ज्या अनुभवातून गेलो त्याचं पडद्यावर दर्शन होईल अशी इच्छा होती पण सिनेमाने खूप म्हणजे खूपच निराशा केली.  हा सिनेमा मला सकारात्मक पलायनवादी वाटला. यातील दाखवलेली गोष्ट प्रत्यक्षात घडू शकते हे मान्य पण दिग्दर्शक-कथा-पटकथाकारांचा दृष्टीकोन शिक्षण घेणं हे किती गरजेचं आहे या वर भर देणारा वाटला. उदा. पट्या नावाचं एक पात्र आहे जे की त्याच्या काकाकडे राहत असतो.  तो शाळा झाली की काकाला त्याच्या व्यवसायात मदत करत असतो. हा व याच्या तुकडीतले...

दुसरी गोष्ट : आशयात कमकुवत

Image
आजचा दिवस माझा साठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा वाढणं साहजिक आहे. आजचा दिवस माझा ची थीम लहानशी होती. स्वतःच्या गुर्मीत असणाऱ्या मुख्यमंत्र्याकडून एका वृद्ध गायकाचा अपमान होतो त्याचे शल्य कमी करण्यासाठी ते एका रात्रीतून सरकारी यंत्रणा हलवून त्यांना सरकारने देऊ केलेला फ्लॅट मिळवून देतात. सरकारी यंत्रणा किती निर्ढावलेली आहे जर राज्याच्या मुख्यमंत्र्याने मनावर घेतले तर अधिकाराचा वापर करून कामं सुरळीत करू शकतात असा संदेश त्यात दिलेला होता. पटकथेने अतर्क्य गोष्टी न मांडता टप्याटप्याने मुख्यमंत्री काम कसे करतात हे चांगल्या पद्धतीने दाखवले होते. वास्तव आयुष्यात हे शक्य नाही तरी त्या पाठीमागचा विचार पोचवण्यासाठी कथानकाने ते काम चोखपणे पार पडले होते. तरीही सिनेमाने म्हणावा तसा प्रभाव पाडला नव्हता. चंद्रकांत कुलकर्णींनी पुढील सिनेमासाठी एक भव्य विषय का निवडला हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो. या सिनेमाचा केंद्रबिंदू असणारी दगडू ऊर्फ प्रसन्नकुमार शिंदे (तीन वेगवेगळ्या वयोगटातले विक्रम गोखले, संदीप मेहता व सिद्धांत चांदेकर उतरत्या ...

यंगिस्तान : सरप्राईज पॅकेज

Image
स्टार असणारा अभिनेता नसेल तरी ज्याने आजपर्यंत दखल घेण्याइतपत सुद्धा अभिनय केलेला नसेल आणि ज्यात आजच्या काळातले तीन महत्त्वाचे अनुभवी , समजूतदार अभिनेते असतील तर त्या सिनेमाकडून काय अपेक्षा ठेवायच्या ?  मला हा प्रश्न सिनेमाला जाताना पडला होता. दुसरं कारण सिनेमात असणारा राजकारण हा विषय. राजकारण , राजकीय नेत्यांवर आधारित सिनेमे आपल्या इथे तितकेसे प्रभावी नाहीत. त्यामुळे हा सिनेमा बघताना मी साशंक होतो. पण सिनेमाने कुठेही निराशा केली नाही उलट एक छान कथा चांगल्या पटकथेद्वारे एक पटणारा सिनेमा म्हणून समोर येते.   अभिमन्यू कौल (जॅकी  भगनानी) हा जपानमध्ये एका कॉम्प्युटर गेम्स बनवणाऱ्या कंपनीत का माला असतो. त्याची एक लिव्ह-ईन रिलेशनशिपमधली मैत्रीण पण असते. महिन्याला सहा लाख रुपये पगार असणारा हा अठ्ठावीस वर्षाचा तरुण त्याच्या वयाला साजेसं स्वच्छंदी आयुष्य जगात असतो अन् एका दुर्दैवी घटनेमुळे त्याचं आयुष्य बदलून जातं. त्याचे वडील मृत्यूशय्येवर असतात. त्याच्याकडून एक वचन घेऊन प्राण त्यागतात. तो भारतात येतो. अखिल भारतीय क्रांती पार्टीच्या शिफारशीवर भारताचा पंतप्रधान होतो. त्याचे...

द घोस्ट रायटर : राजकीय थ्रिलर

Image
मला नेहमीच मोठ्या दिग्दर्शकांच्या मोठ्या सिनेमांपेक्षा छोटे सिनेमे जास्त आवडतात. उदा. कुरोसावाचा हाय अँड लो , हिचकॉकचा रोप , स्पीलबर्गचा वॉर ऑफ द वर्ल्डस . हे सिनेमे त्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकणाऱ्या सिनेमांसारखे नाहीत तरी त्यांचं महत्व कमी होत नाही कारण त्यांनी त्या विषयाकडे एका खास दृष्टीकोणातून पाहिलेलं असतं. रोमन पोलंस्कीचे सिनेमेसुद्धा जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे आहेत हे आपल्याला माहितच आहे. हा सिनेमा जरी त्याच्या आधीच्या सिनेमांसारखा नसला तरी आपला छोटेखानी प्रभाव सोडणारा आहे. अॅडम लँग (पियर्स ब्रॉस्नन) हे पूर्वाश्रमीचे ब्रिटिश पंतप्रधान आपल्या आयुष्यावर आधारित मेमॉयर लिहायचं ठरवतात. त्यांचा पहिला घोस्ट रायटर माईक मॅकआरा समुद्र किनारी मेलेला आढळतो. जे सिनेमाच्या सुरुवातीलाच दाखवलं जातं. त्याच्या ऐवजी एका नवीन घोस्ट रायटरला (इवान मॅकग्रेगर) हे काम दिलं जातं. काम करत असताना त्याला आधीच्या लेखकाने लँग आणि लँगच्या राजकीय कारकिर्दीबद्दलचे काही रहस्य शोधलेले असतात ते हाती लागतात. तो त्यांचा माग काढायचा प्रयत्न करतो पण त्यात त्याचा जीव जाण्याचा धोका निर्माण होतो. तर...