Posts

तलवार : वास्तववादी केस स्टडी

Image
लातूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या बाहेरील दर्शनी बाजूस एक भित्तीचित्र आहे. न्यायदेवतेचं. एका चित्रकारानं काढलेलं. वरतून खालपर्यंत. न्यायदेवता एक स्त्री आहे. तिच्या डाव्या हातात तराजू आहे. उजव्या हातात तलवार आहे. तिने डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. पण हे चित्र नेहमीच्या शैलीत नाही तर कलात्मक दृष्ट्या आधुनिक प्रकारात मोडेल असं बनवलेलं आहे. सिनेमात न्यायदेवता तिच्या वेगळ्या संदर्भासह येते तेव्हा अपरिहार्यपणे त्या चित्राची आठवण झाली. कानून के हात लंबे होते है, कानून के शिकंजे में फसे तो उससे बाहर निकलना मुश्कील होता है किंवा ये हात नहीं फांसी का फंदा है गब्बर सारखे हिंदी सिनेमातच शोभून दिसणारे संवाद, त्यासोबत कानूनने पर्यायाने पोलिसांची तपास यंत्रणा सुद्धा बऱ्याच सिनेमात बघितली आहे. ती किती खोटी व वास्तवापासून दूर असायची हे सुद्धा बऱ्याचदा चर्चिल गेलं.  या पार्श्वभूमीवर तलवार वेगळा ठरतो. सीडीआय (सेन्ट्रल डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टेगेशन) च्या वार्षिक समारंभात आश्विन कुमारला (इरफान खान) एक डबल मर्डर केस सोपवली जाते. दिल्लीतल्या नोएडा परिसरात दंतवैद्...

युद्ध जिवांचे : मानवाची निर्जंतुक न होणारी चिंता.

Image
...पण इतिहासाचा आधार घ्यायचा, तर तशी ती नव्हती, असं छातीठोकपणे सांगता येणार नाही, हे नक्की आणि हा मुद्दा फक्त स्वाईन फ्लू किंवा बर्ड फ्लू यांच्यापुरताच मर्यादित नाही. आपल्या औषधांच्या नमुन्यासाठी जाणूनबुजून किंवा अगदी क्वचित अहेतुकपणे अनेकदा तिसऱ्या जगातल्या जनतेचा वापर झालाय, हे असं होतच असतं. मोठ्या माशांची भूक भागवणं हेच छोट्या माशांचं प्राक्तन असतं, असं जंगलाचा कायदा असतो. म्हणजे आपण आधुनिक वगैरे युगात जंगलाच्याच कायद्यानं जगतोय की काय? या प्रश्नाचं उत्तर ज्यानं त्यानं शोधायचं. सापडलं, ते इतरांना सांगण्यासाठी धीर गोळा करायचा. आणि नाहीच जमलं, तर हे पुस्तक बंद करून डोक्यातली खदखद बाहेर पडू नये, यासाठी डोळे मिटून पडून राहायचं, असहाय्य शांतपणे!... –- सर्वे जन्तु निरामयाः या पुस्तकाची सांगता वरील उपसंहार असणाऱ्या प्रकरणातील शेवटच्या परिच्छेदाने होते. मानवी समूहाची काळजी ज्या पद्धतीने गिरीश कुबेर व्यक्त करतात ती खचितच मराठीत एखाद्या पुस्तकात आली आहे. खासकरून आणि नाहीच जमलं, तर हे पुस्तक बंद करून डोक्यातली खदखद बाहेर पडू नये, यासाठी डोळे मिटून पडून राहायचं, असहाय्य शांतपण...

फटा पोस्टर निकला हिरो : (स्वतःच्या) प्रेमात पडलेल्याचा रिझल्ट

Image
९४ साली अंदाज अपना अपना हा सिनेमा आधीच्या वर्षी आलेल्या दामिनी नंतरचा राजकुमार संतोषीचा दिग्दर्शक म्हणून तिसराच सिनेमा. घायल मधून दिग्दर्शक म्हणून पुढे आलेल्या या दिग्दर्शकाने नव्वदच्या दशकात असणाऱ्या फॉर्म्युला सिनेमांना व्यवसायिक चौकटीत वेगळं काय देता येईल या विचाराने बनवले होते असा समीक्षकांचं म्हणणं होतं. दामिनीसारखा कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, घराने की इज्जत ला चौकटीच्या मर्यादा न तोडता छान पेश केलं त्यामुळे प्रेक्षक आणि समीक्षक खूष झाले. या नंतर लगेचच आमीर खान आणि सलमान खान द्वयीचा अंदाज अपना अपना आला. त्याची झलक दामिनीतल्या एका गाण्यात दाखवलेली. दोन महत्वाचे आणि गंभीर विषय असणारे सिनेमे देणारा दिग्दर्शक म्हणून सर्वांची उत्सुकता होती की यात काय असेल. सिनेमा प्रदर्शित झाल्या झाल्या समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी झोडपला. त्या काळाला अनपेक्षित असणारं कथानक, कथेला मुद्दामहून दिलेला बाळबोध सूर, लहान मुलांच्या कथेत शोभावा असा खलनायक तो ही शक्ती कपूर ज्याने त्याच वर्षी आलेल्या राजा बाबू  मध्ये त्याच पद्धतीचा रोल केला असं सर्वांना वाटणं, हिंदी व्यावसायिक सिनेमाची उडवलेली...

किस किसको प्यार करू : अपग्रेडेड साजन चले ससूराल

Image
डेव्हिड धवनचा १९९६ साली साजन चले ससूराल आला तेव्हा नेहमीप्रमाणे त्याच्यावर टीका झाली. त्यातील दोन हिरोइन्स, गोविंदा-सतीश कौशिकचा आचरट विनोद, डेव्हिड धवनची दाक्षिणात्य सिनेमांचा रिमेक करण्याची हौस, गोविंदा-धवन जोडीचा विनोदाच्या नावाखाली काहीही दाखवण्याचा अट्टाहास या व अशा बऱ्याच गोष्टींचा समाचार घेण्यात आला. नव्वदच्या दशकातला सिनेमा विशिष्ट फॉर्म्युला घेऊन बनवला जायचा. त्याला तार्किकता, वास्तवाशी निगडीत असणे वगैरे गोष्टी फिजूल वाटायच्या. सिनेमा हा मनोरंजनासाठी असावा/असतो या तत्वज्ञानावर त्यांची श्रद्धा असायची. तरीही एक अलिखित संकेत नेहमी पाळला जायचा तो म्हणजे ज्या दिग्दर्शकाने सुरुवातीला ज्या पद्धतीचा सिनेमा बनवला पुढे त्याने तसाच सिनेमा बनवायचा. आपला दायरा सोडून जायचं नाही. उदा. डेव्हिड धवनने कॉमेडीच करायची, आदित्य चोप्रा किंवा सुरज बडजात्याने फॅमिली ड्रामा बनवायचे तसेच अब्बास-मस्तान जोडीने सूडपट किंवा अॅक्शन थ्रिलर्स. अशा ठरलेल्या चौकटीतून बाहेर येऊन जेव्हा या दिग्दर्शकांनी सिनेमे बनवले तेव्हा ते खूप यशस्वी ठरले असे नाही. अब्बास-मस्तान जोडीने शाहरुख खानला घेऊन बादशाह बनवून ...

कट्टी बट्टी : ऑफ बीट सादरीकरण

Image
हृषिदांच्या बावर्चीमध्ये एक छान संवाद आहे. असरानी राजेश खन्नाला एका सिनेमात आपल्याला असं असं गाणं घ्यायचं आहे तर ते कसं असेल ते सांगत असतो. सांगताना तो म्हणतो, “ये गाना हिरो नही बल्की गाडीवान गाता है. यहाँ हमारी फिल्म ऑफ़ बीट हो जाती है.” ऑफ बीट सिनेमा असं संबोधून संवादलेखक गुलजार-दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी जोडीने समांतर सिनेमाला मारलेली नर्मविनोदी कोपरखळी त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेली. पुढे हृषीदांचेच सिनेमे मिडल ऑफ द रोड हे नवं नामाभिधान घेऊन चर्चिले गेले. निखील अडवाणींचा या ऑफ बीट सिनेमा संकल्पनेवर बराच जीव असावा. कारण एका आठवड्याच्या फरकाने त्यांनी निःसंशय वेगळा सिनेमा दिला आहे. एका रुममध्ये घरगुती कॅमेऱ्याच्या साहाय्याने एक तरुणी एका तरुणाला चित्रित करत आहे. श्रेयनामावलीसोबत असणारं हे पाँईंट ऑफ व्ह्यू चित्रीकरण थेट त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावते. प्रेक्षक सरसावून बसतात. पुढच्याच प्रसंगात तो तरुण मॅडी/माधव काबरा (इमरान खान) हॉस्पिटलमध्ये दाखील होतो का तर त्याने बिअरच्या ऐवजी फिनाईल प्यायलेलं असतं. ती तरुणी पायल [तिला आडनाव का नसतं याचं स्पष्टीकरण दि...

हिरो : मागील पानावरून पुढे

Image
२००० साली हिंदी व्यावसायिक सिनेमातल्या तीन अभिनेत्यांच्या पुत्रांनी सिनेश्रुष्टीत झोकदार एन्ट्री केली. पैकी दोन स्टार पुत्र होते तर एक नुसताच अभिनेत्याचा मुलगा. पहिले होते राज कपूरची नात आणि रणधीर-बबिताची मुलगी करीना कपूर, अभिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन. त्यामुळे त्यांच्या सिनेमाश्रुष्टीतल्या प्रवेशाकडे सर्वांचे डोळे लागलेले. सिनेमा रिफ्युजी. तिसरा अभिनेता होता राकेश रोशन नावाच्या अभिनेत्याचा हृतिक रोशन मुलगा. चिकनाचुपडा, उंचापुरा, बॉडी बिल्डींग करून मस्त शरीरयष्टीचा. सिनेमा कहो ना प्यार है. राकेशच्या नावावर यशस्वी सिनेमे देणारा दिग्दर्शक असा लौकिक, तर जेपी दत्तांच्या सोबत साक्षात सिनेमातले स्टारपुत्र. राकेशचा नेहमी यशस्वी होणारा फॉर्म्युला कथेत होता तर जेपींनी वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर प्रेम फुलवण्याचा चंग बांधलेला. कहो ना... प्रचंड यशस्वी झाला. रिफ्युजी सुश्राव्य गाणी असून सुद्धा पडला. मल्टीप्लेक्स कल्चर अजून फोफावलेलं नव्हतं. त्या पूर्वी नव्वदच्या दशकातल्या सिनेमाची रचना, शैली, नायक-नायिका-खलनायक हे ठरलेले होतं. प्रेक्षकांना हवं ते मिळालं. सोबत एक गोष्ट घडली जी हिंद...

दुनियादारी : रुपांतरीत मेलोड्रामा

Image
चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक यांची कामगिरी जवळपास तुल्यबळ असते. दिग्दर्शकाचा दर्जा थोडा वर जातो कारण चित्रपट प्रत्यक्ष उभा करण्याची जबाबदारी ही त्याच्या खांद्यावर असते. छायाचित्रणापासून नेपथ्यापर्यंत आणि अभिनयापासून संकलनापर्यंत ज्या गोष्टी विविध कलावंत/तंत्रज्ञांमध्ये विभागलेल्या असतात त्यांच्याकडून एकसंध कामगिरी काढून घेणे हे त्याच्या हातात असतं. मात्र ही कामगिरी काय प्रकारची असावी याची दृष्टी जर अचूक असायला हवी असेल तर त्या दृष्टीमागे लेखक आणि दिग्दर्शक या दोघांचाही सहभाग लागतो. या दृष्टीत एकसंधता यावी आणि तडजोड करावी लागू नये म्हणून काही वेळा दिग्दर्शक स्वतःच संहिताही लिहू पाहतात. मात्र हे तात्पुरता मतभेद टाळणारं असलं तरी चित्रपटाच्या दृष्टीने न्याय नाही. लेखक आणि दिग्दर्शक हे एकाच कथेसाठी काम करत असले तरी त्यांची विचार करण्याची पद्धत बरीच वेगवेगळी असते. लेखकाच्या डोक्यात महत्त्व असतं ते आशयाला तर दिग्दर्शक बहुधा सादरीकरणाचा विचार करत असतो. त्यामुळे जर दिग्दर्शकाने एकट्याने पटकथा लिहिली तर तो जे सांगायचं आहे त्याला महत्त्व देण्याऐवजी चित्रपटाच्या दृश्यात्मकतेवर अधिक भर देईल अश...