फटा पोस्टर निकला हिरो : (स्वतःच्या) प्रेमात पडलेल्याचा रिझल्ट
९४ साली अंदाज अपना अपना हा सिनेमा आधीच्या वर्षी आलेल्या दामिनी नंतरचा राजकुमार संतोषीचा दिग्दर्शक म्हणून तिसराच सिनेमा. घायल मधून दिग्दर्शक म्हणून पुढे आलेल्या या दिग्दर्शकाने नव्वदच्या दशकात असणाऱ्या फॉर्म्युला सिनेमांना व्यवसायिक चौकटीत वेगळं काय देता येईल या विचाराने बनवले होते असा समीक्षकांचं म्हणणं होतं. दामिनीसारखा कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, घराने की इज्जत ला चौकटीच्या मर्यादा न तोडता छान पेश केलं त्यामुळे प्रेक्षक आणि समीक्षक खूष झाले. या नंतर लगेचच आमीर खान आणि सलमान खान द्वयीचा अंदाज अपना अपना आला. त्याची झलक दामिनीतल्या एका गाण्यात दाखवलेली. दोन महत्वाचे आणि गंभीर विषय असणारे सिनेमे देणारा दिग्दर्शक म्हणून सर्वांची उत्सुकता होती की यात काय असेल. सिनेमा प्रदर्शित झाल्या झाल्या समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी झोडपला. त्या काळाला अनपेक्षित असणारं कथानक, कथेला मुद्दामहून दिलेला बाळबोध सूर, लहान मुलांच्या कथेत शोभावा असा खलनायक तो ही शक्ती कपूर ज्याने त्याच वर्षी आलेल्या राजा बाबू मध्ये त्याच पद्धतीचा रोल केला असं सर्वांना वाटणं, हिंदी व्यावसायिक सिनेमाची उडवलेली...