Posts

Showing posts from August, 2015

प्यादा आणि हिंदी पल्प फिक्शन

Image
लातुरातल्या मुख्य बस स्टँडमधल्या पेपर स्टॉलला भेट देणे हे लातुरात असतानाचे नित्यकर्मच असते. (आजही तो आहे.) शाळेत असताना त्या वेळी कार नसल्यामुळे म. रा. प. म. (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) च्या गाड्यातून दुसऱ्या गावी जाणे हाच पर्याय होता. उदगीर, गुलबर्गा, हुमनाबाद अशा गावांना जायला बस स्टँडलाच जायला लागायचं त्यामुळे तिथे गेलं की आधी त्या पेपर स्टॉलचं दर्शन घेणं ठरलेलं असायचं. त्याच्या समोरच्या एका बाजूला कॉमिक्स ठेवलेले असायचे. राज आणि डायमंड कॉमिक्सचे नायक नागराज, सुपर कमांडो ध्रुव, डोगा, भोकाल, बांकेलाल, चाचा चौधरी व इतरांचे कॉमिक्स ठेवलेले असायचे. त्यांना चाळून ते घेण्यासाठी वडिलांच्या मागे लागायचं. मला आठवतंय तेव्हा माझ्याकडे किमान शंभराच्यावर कॉमिक्स होते. ते नंतर कधीतरी आईनं मागे लागून रद्दीत घालायला लावले का तर त्यामुळे मी अभ्यास करायचो नाही. मग प्रवासात आणि ज्या ठिकाणी गेलं खासकरून उदगीरला गेल्यावर एका खोलीतल्या पलंगावर झोपून त्यात हरवून जायचं हे नेहमीचं. तिथेच त्या स्टॉलवाल्याच्या पाठीमागे तिन्ही बाजूनी असणाऱ्या शो-केसमध्ये जाडजूड पुस्तकं ठेवलेली असायची. ती...

हायवे एक सेल्फी आरपार : आयुष्याचा कोलाज

Image
प्रवास सर्वचजण करतात. कधी स्वतःच्या वाहनाने, कधी खाजगी नाहीतर सरकारी बसने, कधी टॅक्सीत तर कधी ट्रकने. हा प्रवास कोणत्या आर्थिक थरातले आहात तसेच कुठे जायचे आहे यावर अवलंबून असतो. म्हणजे एखादी एनआरआय व्यक्ती ट्रकमध्ये लिफ्ट घेऊन प्रवास करणार नाही की ज्याची आर्थिक परिस्थिती खूपच कमी आहे ज्याला सरकारी किंवा खाजगी बस परवडणार नाही तो भाड्याने कार किंवा टॅक्सी नाही घेणार. तसच प्रवास आड बाजूच्या रस्त्याने न करता एखाद्या हायवेवर किंवा एक्स्प्रेस हायवेवर होणार असेल तर प्रवास करणाऱ्यासोबत असंख्य लोकं इतर गाड्यांमध्ये असतात. त्यावेळी जो व्यक्ती ज्या वाहनातून जात असेल तो आजूबाजूच्या गाड्यात कोण लोकं आहेत याचा विचार करत नाही. तो त्यांच्या आयुष्याला कुठेही छेदणार नाही किंवा ते त्याच्या आयुष्यात येऊन गोंधळ घालणार नाहीत. तरीही प्रवासा दरम्यान कधीतरी एखादा प्रवासी दुसऱ्याचा विचार करत असेल का! करतात का नाही हे सांगता नाही येत पण उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी या पटकथाकार-दिग्दर्शक जोडीने तसा विचार केलेला आहे. हायवे सिनेमा चालू होतो मुंबईतल्या नेहमीच्या सकाळी. पडद्यावर दिसतं असंख्य पात्र वेगवे...

स्लॅम बुक : हृदयची हृदय आठवण

Image
कॉलेजात जाणाऱ्यांसाठी शेवटच्या वर्षी स्लॅम बुक नावाच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या संकल्पनेला सामोरं जावं लागतं. कॉलेजात प्रत्येकाचा छोटासा ग्रुप असतो. जितकं शिक्षण घेऊ तितक्या त्या आठवणी जपण्याच्या प्रयत्न प्रत्येकाचा असतो. मग त्यात आपण काय काय, कसं कसं केलं किंवा आपल्याला कोण कोण आवडतं किंवा कुणाशी आपलं पटत नाही वगैरे बाबी असतात. पुढे चालून नॉस्ताल्जिया मूडमध्ये जुन्या आठवणी काढून त्यावर चर्चा, कमेंट करायला सर्वांनाच आवडतं. भावविश्वाचा भाग असतो तो. त्यातल्याच आठवणी जपून ठेवण्याचं किंवा दस्तावेजीकरणाचं कित्येक प्रसंगात साथ देणाऱ्या छोट्याश्या कॅमेरासोबत स्लॅम बुक पण असतं. हृदय नावाच्या अशाच एका नायकाची ही कथा. हृदय (शंतनू रांगणेकर) एके सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजातनं घरी आल्यावर गच्चीवर जातो. कॉलनीत कुठे काही आहे का ते बघायला. तर घराच्या समोरच एक मोठा ट्रक थांबलेला असतो. त्यातनं सामान उतरवून घेणारे जोडपे असते तसेच एक सुंदर मुलगी भलीमोठी सुटकेस घरात नेण्यासाठी धडपडत असते. तिचं नाव अपर्णा (रितिका श्रोत्री). यथावकाश नायक तिच्या प्रेमात पडतो. तिला ठरल्याप्रमाणे लगेच सुटकेस आत नेण्यासाठी...

प्रणव सखदेव, कविता दातीर आणि बालाजी सूर्यवंशी.

Image
जे घडून गेलं त्याचा खेद नाही पुढयात काय वाढलंय याची चिंता नाही आत्ता आहे पृथ्वीवर आहे पृथ्वी फिरतेय स्वतः भोवती सूर्याभोवती … प्रणवने लिहिलेल्या कवितासंग्रहातील एका कवितेच्या वरील काही ओळी. सर्व कविता आजच्या काळाशी निगडीत लिहिलेल्या आहेत त्यामुळे वाचायला सोप्या. माझ्यासारख्या कवितेच्या जवळ न फिरकणाऱ्या माणसाला तर यांच्यातलं फार काही कळत नाही. तसेच मराठीत सध्या कवितेत कोणता प्रवाह आहे किंवा नवं काय आहे ते पण माहित नाही. शाळेत क्रमिक पुस्तकात असणाऱ्या मराठी कविता ज्या आता आठवत पण नाहीत पण गाईडातून त्यांचे अर्थ समजून घेऊन त्यातलीच उत्तरं पाठ करून उत्तरं सोडवण्यापुरत्या वाचलेल्या. पुढे शाळा संपल्यावर अकरावीला सायन्स घेतलं, डॉक्टर होण्यासाठी. सायन्स घेतलं म्हटल्यावर सायन्स फिक्शन वाचणे ओघाने आलेच असा प्रघात नसला तरी जयंत नारळीकर, निरंजन घाटे, लक्ष्मण लोंढे यांच्या कथा-कादंबऱ्या आणि मोहन आपटे, बाळ फोंडके यांची वैज्ञानिक पुस्तके वाचायचा छंद लागला. डॉक्टरीला जाता आलं नाही कारण तेवढा अभ्यासच नव्हता. त्यामुळे मग कॉमर्स परत यु टर्न मारून बीएस्सी करत करत दोन्ही ठिका...

सनशाईन : मानवाची क्षुद्रता

Image
सायन्स फिक्शन या सिनेमाच्या उप-प्रकारात मानवाच्या अस्तित्वावर जर प्रश्नचिन्ह उभे राहिले तर त्यात काय होईल आणि मानवाने त्यावर काय उपाय सुचवले या आधारे कधी थ्रिलरच्या अंगाने तर कधी त्याच्या खोलात जाऊन त्यावर निश्चित भाष्य केलं जातं. मागच्या वर्षी आलेल्या इंटरस्टेलर सिनेमात जर भविष्यात खरंच मानवाचं अस्तित्व धोक्यात आलं तर मानवाने काय उपाय शोधावे याची शक्यता गृहीत धरून मानवाचं भविष्य कसं असेल याची चुणूक दाखवली होती. त्यामुळे त्यात विज्ञानाला पर्यायाने वैज्ञानिक संकल्पनांना मुख्य स्थान होतं. त्याचे होणारे संभाव्य परिणाम एका कुटुंबाच्या प्रातिनिधिक चित्रणाने दाखवण्यात आले. दुसरी बाब यात प्रकर्षाने दिग्दर्शकाने बिंबवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे मानवाची क्षुद्रता. या अनिमिष पसरलेल्या जगात मानवाचं अस्तित्व ते काय! मानव हा मुळातच क्षुद्र आहे. त्याने त्याचा बडेजाव न मांडता स्वतःच्या अस्तित्वाची पुनर्चीकित्सा करावी. असा उघड संदेश सिनेमा देतो. अशा प्रकारचा संदेश वगैरे द्यायच्या भानगडीत न पडता २००७ साली आलेला सनशाईन (दिग्दर्शक डॅनी बॉईल) सिनेमा आपल्या नजीकच्या भविष्यात पृथ्वीच्या अस्तित्वाल...

घेता किती घेशील दो कराने

Image
(या वर्षीचा अर्थ ओव्हरशूट डे आज आहे. जो मागच्या वर्षीपेक्षा सहा दिवस आधीच आला आहे. या निमित्ताने मागच्या वर्षी अन्वयार्थ दिवाळी अंकासाठी एक लेख लिहिला होता तो आज ब्लॉग पोस्ट म्हणून टाकत आहे.) या वर्षीचा १९ ऑगस्ट हा दिवस तसा नेहमीचाच होता. खासकरून भारतातल्या लोकांसाठी तर तो काल जसा तसाच आज पण असेल या अर्थाचाच होता. भारताबाहेर मात्र हा दिवस अर्थ ओव्हरशूट डे म्हणून साजरा करण्यात आला. वर्षातले काही दिवस विशेषत्वाने साजरे केले जातात तसा हा दिवस मस्तपैकी केक, फटाके वगैरे आणून साजरा करण्यात आला नाही तर त्या दिवशी पृथ्वीच्या भविष्याची चिंता व्यक्त करण्यात आली. मुळात आपल्याला असा दिवस का निरीक्षणासाठी बाजूला काढून ठेवावासा वाटतोय हे बघणं अधिक गरजेचं आहे . कॅनडास्थित ब्रिटीश कोलंबिया या विद्यापीठातील दोन विद्वान प्राध्यापकांना असे वाटले की गेल्या शंभर - दीडशे वर्षात ज्या पद्धतीने औद्योगिककीकरणाची, विज्ञान-तंत्रज्ञानाची झालेली प्रगती, त्या आधारित ज्यांच्यासाठी कच्चा माल म्हणून नैसर्गिक आणि मानव निर्मित मुलद्रव्यांची घेतली गेलेली मदत त्याद्वारे न भूतो न भविष...